चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या आजरा शहराचा विकास आराखडा रद्द करा.- भाजप ता.अध्यक्ष. सुधीर कुंभार. ( मुख्याधिकारी यांना निवेदन.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत वतीने नगररचना विभागाच्या वतीने आजरा शहराचा नगर विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून याबाबत सहमती मागितल्या आहेत. मुळात प्रथम दर्शनी सदर आराखड्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने दिसून येत आहेत सामाजिक स्मशान भूमीमधून रस्त्याचा आराखडा पडला आहे. नदीकाठी वरील क्षेत्र निवासी करण्याकरता आरक्षित जाहीर केले आहे. प्रत्यक्षात यातील बहुतांशी छत्र हे पूर्व बाधित क्षेत्र म्हणून ओळखले जाते यासारख्या अनेक त्रुट आराखड्यात दिसत आहेत. तसेच हा आराखडा प्रतीक कालावधी करिता उपयोगात आणला जाणार आहेत. त्यामुळे सदर आराखडा सामान्य शहरवासीयांच्या निदर्शनात सहजरीत्या आणला गेला पाहिजेत मुळात या आराखड्याबाबत शरवासीयांची अनभिज्ञ आहेत. त्यामुळे नगरपंचायतच्या पुढाकाराने शहरवासीयांच्या बाबत विशेष सभा घेऊन सदर आढावा समजून सांगणे गरजेचे आहे. याबाबत तात्काळ कारवाई व केवळ याच विषयावर स्वतंत्र बैठक बोलावी असे नाही. झाल्यास शहरवासीयांच्या कायदेशीर मागणी मागण्याचा हक्क राहील. पिवळा पट्टा आरक्षित केलेल्या ठिकाणी काही विशिष्ट समाजाच्या मालकी हक्काचा स्मशानभूमी मधून ही रस्ते अधोरेखित केले आहेत अशा प्रदर्शित झालेल्या सर्व कमालीच्या विषयाबाबत आजरा शहरवासीयांना सदर आराखडा समजून सांगावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नगरसेवक आनंदा कुंभार, भाजप नेते आजरा अरुण देसाई, उपस्थित होते.
