तीन विद्यार्थीनींशी गैरकृत्य करणार्या शिक्षकाला ५ वर्षे सश्रम कारावास.
रत्नागिरी :- प्रतिनिधी.
तालुक्यातील साठरेबांबर येथे पहिलीत शिकणार्या ३ मुलींशी गैरकृत्य करणार्या शिक्षकाला न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास व ९ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. रमेश रतन जाधव (५१, रा. पोचरी, ता. संगमेश्वर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. शाळकरी मुलींसोबत घडलेल्या या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात आला होता.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून ऍड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले. खटल्यातील माहितीनुसार आरोपी रमेश जाधव हा साठरेबांबर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. २४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास शिक्षक रमेश जाधव याने पहिलीत शिकणार्या ६ वर्षीय ३ मुलींसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
