जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेतील समुहनृत्य स्पर्धेत श्री विठ्ठल विद्यामंदिर पेद्रेवाडी शाळेचा प्रथम क्रमांक.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी येथील प्राथमिक शाळेने
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. या मध्ये समुहनृत्य प्रकारात श्री विठ्ठल विद्यामंदिर पेद्रेवाडी ता आजरा शाळेचा प्रथम क्रमांक आला. त्यांनी गोवा राज्यातील दिवली नृत्य सादर केले. त्यामध्ये समर्थ सागर शिंत्रे या विद्यार्थ्याच्य सुरेल गायनाने सगळ्यांची मने जिंकली. तर
आर्यन मंगेश बाणेकर, आर्यन कदम, साहिल गायकवाड, कुणाल आजगेकर, सबूरी कबीर, वैष्णवी ढवळे, सानवी देवरकर, केतकी दिवेकर, आदिती पाटील, श्रावणी चव्हाण.या विद्यार्थ्यांनी नृत्यमध्ये सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना नृत्यासाठी सागर कांबळे, मिनाक्षी दोड्डमनी, विपुल गाडे, यांनी मार्गदर्शन केले तर संगीत साथ पांडुरंग मांगवकर सर, अनिल बागडी सर, सचिन कांबळे, विश्वनाथ कांबळे यांची मिळाली. गटशिक्षणाधिकारी श्री गुरव, शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुनीत चंद्रमणी, श्री विलास पाटील व केंद्रमुख्याध्यापक अशोक लोहार, मुख्याध्यापक श्रीधर मांगले,
विजय कातकर, शशिकांत पाटील
हणमंत सुतार, सोनाली करडे यांचे प्रोत्साहन लाभले. तर ग्रामस्थांचे मुलांना या सादरीकरणासाठी मोठे आर्थिक पाठबळ मिळाले.
