Homeकोंकण - ठाणेनिर्भिड पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या भ्याड हत्येचा. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर रिपोर्टर...

निर्भिड पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या भ्याड हत्येचा. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने निषेध.- जिल्हाध्यक्ष सुधाकर निर्मळ

निर्भिड पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या भ्याड हत्येचा. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने निषेध.- जिल्हाध्यक्ष सुधाकर निर्मळ

कोल्हापूर. – प्रतिनिधी.

अन्यायाविरुद्ध धडाडणारी तोफ म्हणून ओळखले जाणारे दै. ‘महानगरी टाईम्स चे झुंजार पत्रकार श्री. शशिकांत वारीशे यांची भ्याड हत्या करण्यात आल्याचा संशय असुन महाराष्ट्र हत्येचा तीव्र शब्दात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुधाकर निर्मळे व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सदस्यांनी निषेध करीत आहे.
श्री. वारीशे हे सातत्याने रिफायनरी विरोधी जनमताचा आवाज बुलंद करीत होते. त्यांची शेवटची बातमी दि. ६ फेब्रुवारी, २०२३ च्या ‘महानगरी टाईम्स मध्ये प्रसिद्ध झाली होती. आंगणेवाडी यात्रेनिमित्त पंतप्रधान मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरवर गंभीर गुन्हयातील आरोपीचे फोटो असल्याची ती बातमी होती. तो आरोपी म्हणजे रिफायनरी प्रस्तावित होऊ शकणाऱ्या भागात जमिनींचे व्यवहार करणारा होता. संशयीत आरोपीने सोमवारी दु. १.०० वाजता राजापूर महामार्गावरील पेट्रोल पंपावर वारीशे यांना पाहिले. त्यानंतर बेसावध असलेल्या वारीशे यांच्या दुचाकीवर आपले वाहन चढवून त्यांची हत्या केली, असा आरोप आहे.
वारीशे यांना आधी रत्नागिरी येथे आणि नंतर बेशुद्धावस्थेत कोल्हापूर येथे हलविण्यात आले. ते पुन्हा शुद्धीवर आलेच नाहीत. आज सकाळी ७.०० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
वारीशे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला आहे.अशाप्रकारे दिवसाढवळ्या पत्रकारांची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे. संबंधित आरोपीला त्वरित अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट वेल्फेअर असोसिएशन मागणी करीत आहे. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे अध्यक्ष कार्यकारणी सदस्य व सर्व अजीव सभासद उपस्थित होते
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.