आजरा मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते संपन्न. अमित ठाकरे यांच्या दौऱ्याने मनसैनिकात नवचैतन्य
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा येथील आजरा तालुका मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दि १/२/३/२०२३ रोजी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. अमित ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.
ठाकरे यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कोल्हापूर, गडहिंग्लज व आजरा या ठिकाणी आयोजित होता. गडहिंग्लज येथे विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजरा गडहिंग्लज व चंदगड परिसरातील या महासंवाद कार्यक्रमात हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला होता.
आजरा येथे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी अमित ठाकरे आप आगे बढो हम आपके साथ है महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा व अध्यक्ष राज ठाकरे यांचा विजय असो आशा घोषणाबाजी देत मनसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. ता. अध्यक्ष अनिल निऊगरे यांनी मनसे युवा नेते अमित ठाकरे यांचे स्वागत केले.
यावेळी संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे, सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, कोल्हापूर शहराचे नगरसेवक राजु दिर्डोले, आजरा तालुका अध्यक्ष अनिल निऊगरे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सरिता सावंत उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई , ता. सचिव चंद्रकांत सांबरेकर, विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष, मनसे आजरा उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, आजरा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शाखाध्यक्ष, मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
