Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा मडिलगेत भावेश्वरी यात्रेचा राखणीसाठी नारळ ठेवण्याचें कार्य संपन्न. - गुरुवार पासून...

आजरा मडिलगेत भावेश्वरी यात्रेचा राखणीसाठी नारळ ठेवण्याचें कार्य संपन्न. – गुरुवार पासून देणगीला प्रारंभ.

आजरा मडिलगेत भावेश्वरी यात्रेचा राखणीसाठी नारळ ठेवण्याचें कार्य संपन्न. – गुरुवार पासून देणगीला प्रारंभ.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील मडिलगे येथील १२ वर्षानी होणाऱ्या भावेश्वरी देवीच्या यात्रेचा राखणीसाठी ठेवला जाणारा नारळ दि. ३१/१/२०२३ रोजी देवस्थान समिती व यात्रा समिती व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ठेवण्यात आला.
भावेश्वरी देवीला नारळ ठेवण्यापूर्वी या देवीची असणारी मसोली ता. आजरा येथील बहिणाबाईस गावचे गुरव दयानंद गुरव, जालिंदर येसणे व मानकरी यांनी नारळ व पानविडा ठेवुन यानंतर मडिलगे गावचे ग्रामदैवत दैवत आई भावेश्वरीस नारळ पान विडा व यात्रेसाठी जमा केली जाणारे पावती पुस्तक ठेवुन गावकरी पंंच, देवस्थान समिती, यात्रा समिती सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत राखणीसाठी नारळ ठेवण्याचे कार्य संपन्न झाले.
यावेळी सरपंच बापु निऊगरे, यात्रा कमिटी अध्यक्ष प्रकाश कडगावकर, माजी सभापती भिकाजी गुरव, माजी सरपंच दिपक देसाई, गणपती आरळगुंडकर, यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मोहिते, उपसरपंच सुशांत गुरव, लोकमान्य समुहाचे प्रमुख जनार्दन निऊगरे, इजि.अनिकेत कवळेकर, खजिनदार विश्वजित मुंज, सचिव संदिप पाटील, गाव पाटील रवी पाटील, बारा बुलूतेदार सदस्य, देवस्थान व यात्रा समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.