विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आज राज्यात मतदान पार पडलं. – नाशिक मध्ये सर्वात कमी मतदान
मुंबई. – प्रतिनिधी.
विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आज राज्यात मतदान पार पडलं. सकाळी 8 वाजता सुरु झालेली मतदानाची प्रक्रिया सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होती. यामध्ये अमरावती, कोकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जिल्ह्यांत मतदान पार पडलं आहे.मात्र, सर्वांचेच लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अवघे 49 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आता 2 फेब्रुवारी 2023 ला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता या पाच मतदार संघात कोण बाजी मारतं? हे 2 फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये जवळपास सरासरी 86.23 टक्के मतदान झाले आहे. तसेच नाशिक विभागात 49.28 टक्के, अमरावती विभागात 49.67 टक्के, औरंगाबाद विभागात 86 टक्के, आणि कोकण विभागात 91.02 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी किती टक्के मतदान झालं?
नाशिक पदवीधर निवडणुकीत 49.28 टक्के मतदान झालं आहे.
जिल्हा निहाय मतदानाची आकडेवारी.
- अहमदनगर जिल्ह्यात 50.40 टक्के मतदान झाले
- धुळे जिल्ह्यात 50.50 टक्के मतदान झाले
- जळगाव जिल्ह्यात जिल्ह्यात 51.44 टक्के मतदान झाले
- नंदूरबार जिल्ह्यात 49.61 टक्के मतदान झाले
अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीत किती टक्के मतदान झालं?
- अमरावती विभागात 49.67 टक्के मतदान झालं
जिल्हा निहाय मतदानाची आकडेवारी
अमरावती – 43.37 टक्के
अकोला – 46.91 टक्के
बुलढाणा – 53.04 टक्के
वाशिम – 54.80 टक्के
यवतमाळ – 58.87 टक्के
नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये किती टक्के मतदान झालं?

- नागपूर विभागात 86.23 टक्के मतदान झालं आहे.
जिल्हा निहाय मतदानाची आकडेवारी.
नागपूर : 81.43 टक्के
वर्धा : 86.82 टक्के
चंद्रपूर : 91.89 टक्के
भंडारा : 89.15 टक्के
गोंदिया : 87.58 टक्के
गडचिरोली : 91.53 टक्के
औरंगाबाद आणि कोकण विभागात किती टक्के मतदान झालं?
- औरंगाबाद विभागात 86 टक्के झालं?
- कोकण विभागात 91.02 टक्के मतदान झाले
