Homeकोंकण - ठाणेव्यक्तिगत सभासद नसलेले युवा नेते चराटी यांनी बालिश पणाने केलेले आरोप चुकीचे....

व्यक्तिगत सभासद नसलेले युवा नेते चराटी यांनी बालिश पणाने केलेले आरोप चुकीचे. – संचालक सुधीर देसाई.

व्यक्तिगत सभासद नसलेले युवा नेते चराटी यांनी बालिश पणाने केलेले आरोप चुकीचे. – संचालक सुधीर देसाई.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुका खरेदी विक्री संघाची होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परस्परविरुद्ध असलेले गटांची आरोप प्रत्यारोपाची पहिल्या फेरीला सुरुवात युवा नेते अनिकेत चराटी यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकांने झाली होती. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात श्री चराटी यांनी आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या विद्यमान संचालकाने काही सभासदांचे मतदानाचे हक्क काढून घेतले असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला उत्तर देताना आजरा शेतकरी संघाचे चेअरमन व संचालक मंडळाने दि. २८ रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी जिल्हा बॅक व शेतकरी संघाचे संचालक सुधीर देसाई म्हणाले कै. अमृतकाका देसाई यांनी या संस्थेची स्थापना करून प्रगतीपथावर नेण्याचे काम केले आहे दरम्यानच्या काळात ही संस्था सभासदांनी व विद्यमान चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळाने निस्वार्थीपणे काम केले आहे. पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९७ पैकी ९६ प्रतिनिधी ठराव जमा झाले आहेत व इतर ११३ पैकी ११२ ठरवायची नावे कळवली आहेत. तर प्रारूप यादी प्रसिद्ध केलेली नाही. याची माहिती घेण्यापूर्वी संघाचे व्यक्तिगत सभासद नसलेले अनिकेत चराटी यांनी बालिश पणाने केलेले आरोप चुकीचे आहेत. यामध्ये २८/९/२०१५ रोजीच्या वार्षिक सभेला विषय नंबर आठ अहवाल पान नंबर २३ पोटनिवडणूक १२ प्रमाणे शंभर रुपये सभासद बाबत ठराव शेतकरी संघाचे भाग भांडवल वाढवण्याच्या दृष्टीने शेअर्स रक्कम वाढवण्यात येणार असल्याचे ठराव केला आहे. यावेळी नेते जयवंतराव शिंपी या सभेला उपस्थित होते त्यांना या ठरावाबाबत विरोध होता तर त्यावेळी करायला पाहिजे होता असे न होता. अनिकेत चराटी यांनी केलेल्या आरोप व तक्रार देतेवेळी उपस्थित असणारे श्री शिंपी यांना सदर ठराव झाल्याची कल्पना असताना सदर चुकीचे आरोप करणं चुकीची बाब आहे. यानंतर श्री शिंपी व अशोक चराटी यांनी आपली वाढीव झालेली शेअर्स रक्कम भरून घेतलेली आहे. यामुळे अनिकेत चराटी यांनी अज्ञान असतील पण शिंपी यांनी माहिती पाहिजे होती. मग चुकीचे आरोप कशासाठी सर्व सभासद सुज्ञ आहेत. सभासदांना वस्तुस्थितीची जाणीव आहे त्यामुळे अशा चुकीच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नसल्याचे श्री देसाई यांनी सांगितले. यावेळी चेअरमन एम. के. देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी श्री म्हणाले आजरा तालुका खरेदी विक्री संघाचा स्वच्छ व पारदर्शक कारभार आहे. संघाने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. खत पुरवठा करत असताना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खत पोचविण्याचा साठी प्रयत्न केले आहेत. व ना नफा ना तोटा या धर्तीवर चांगल्या पद्धतीचे विद्यमान संचालकांनी काम केले आहे. श्री चराटी यांनी केलेले आरोप हे चुकीचे आहेत सहाय्यक निबंधक यांच्या निवडणूक संदर्भातील पत्रानुसार २० संस्था प्रतिनिधी ठराव संस्थेचे प्रतिनिधी पाठवावे व यामध्ये व्यक्ती सभासदांची यादी सादर केली नसल्याचे त्यांनी सांगितले. असे चेअरमन श्री. पाटील म्हणाले.
यावेळी व्हाईस चेअरमन मायादेवी पाटील, मॅनेजर जनार्धन बामणे सह संचालक उपस्थित होते. आभार गणपती सागवे यांनी मानले.

जि. प. माजी. उपाध्यक्ष. जयवंतराव शिंपी.

{ यावेळी जि. प. चे माजी. उपाध्यक्ष शेतकरी संघाचे सभासद जयवंतराव शिंपी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून विचारणा केली असता श्री शिंपी म्हणाले भागातील ज्या उर्वरित सभासदांना ज्यादा ची सभासद रक्कम भरता आली नाही. त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेऊ नये. भाग भांडवल वाढवण्यासाठी सभासद ज्यादा रक्कम वाढवली हा फक्त विषय नसून मतदारांचा हक्क काढून घेऊ नये. उर्वरित रक्कम आपल्या परिस्थितीनुसार सभासद भरतीलच परंतु मतदान व सभासद रक्कम भरणे यामध्ये मतदानाचा दुजाभाव करणे चुकीचा आहे. शेअर्स रक्कम पूर्ण नसल्यास डेव्हिडंट कमी होईल परंतु मतदानाचा हक्क काढून घेतल्यास जुन्या सभासदांना हक्क काढून घेतल्यासारखे आहे. ज्यांनी ही संस्था उभी करताना हातभार लावला होता. हा त्या प्रसिद्धी पत्रकाचा मूळ उद्देश होता. असे श्री शिंपी म्हणाले. } { सुतगिरणी संचालक युवा नेते अनिकेत चराटी यांचा संपर्क होऊ शकला नाही. }

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.