Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा मडिलगेत मोफत आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद. - माहेर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आजरा...

आजरा मडिलगेत मोफत आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद. – माहेर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आजरा व प्राथमिक उप आरोग्य केंद्र मडिलगे आयोजित शिबीराचे आयोजन.

आजरा मडिलगेत मोफत आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद. – माहेर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आजरा व प्राथमिक उप आरोग्य केंद्र मडिलगे आयोजित शिबीराचे आयोजन.

आजरा. – प्रतिनिधी. २५

आजरा मडिलगे येथे माहेर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आजरा व प्राथमिक उप आरोग्य केंद्र मडिलगे आयोजित मोफत आरोग्य शिबीर दि. २५ रोजी संपन्न झाले. शिबीराचे उद्घाटन महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे फोटो पुजन
सरपंच बापु निऊगरे यांच्या व उपस्थितीच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन केले. तसेच उपस्थित ग्रामपंचायत महिला सदस्य व लाभार्थी वृक्षाला पाणी अर्पण करून
यावेळी शिबीराचे सुरवात झाली.
डॉ. बी. बी. गॉडद यांनी शिबीर व माहेर हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत योजनेच्या लाभाची लाभार्थी यांना माहिती दिली.
या शिबिरासाठी डॉ. बी. एफ. गॉडद, डॉ. बी. जी. पाटील, डॉ. कु.पी.एस. संकपाळे, मडिलगे आरोग्य केंद्र सिस्टर सोनल हरमळकर, यांनी लाभार्थी यांच्या आरोग्यसेवा तपासणी केली. डॉ. सौ गॉडद यांनी महिला लाभार्थी यांची तपासणी केली तर डॉ. श्री गॉडद यानी पुरुष लाभार्थी यांची तपासणी करून लाभार्थी यांना मोफत आरोग्य शिबीराचा लाभ दिला. मडिलगे येथील समुदाय अधिकारी अमोल चव्हाण, सेवक संभाजी लटके, आरोग्य सेविका वैशाली येसणे, संगिता पाटील, सुमन कुंभार सह माहेर हॉस्पिटल स्टाप यांचे सहकार्य लाभले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शांताताई सुतार, शामल कातकर, तसेच ग्रामस्थ निलेश घाटगे, वसंत घाटगे, राकेश वागनेकर, प्रकाश कडगावकर, शिवाजी पारळे, हिंन्दुराव कांबळे, शिवाजी इंगळे राजेंद्र येसणे सह ग्रामस्थ लाभार्थी उपस्थित होते.
{ या शिबिरामध्ये लाभार्थी यांना एसीजी व रक्त तपासणी मोफत तर पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी या योजनेमध्ये मुतखडा, प्रोस्टेट, हाडांचे फ्रॅक्चर, दमा, न्युमोनिया, अतिदक्षता मधील उपाचारमुल होण्याच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
तसेच इतर सुविधामध्ये – अतिसंवेदनशील प्रसुती, गर्भाशयाची लॅप्रोस्कोपीक व ओपन सर्जरी, वंध्यत्व निवारण, कलर ड्राॅपलर सोनोग्राफी, डीजीटल एक्सरे, सी. आर्म, व्हेंटिलेटर या सुविधा माहेर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आजरा येथे उपलब्ध आहेत. नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ. गॉडद यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.