Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा शेतकरी संघाच्या विद्यमान संचालक मंडळाने. - बेकायदेशीर काही सभासदांना मतदानाचा हक्क...

आजरा शेतकरी संघाच्या विद्यमान संचालक मंडळाने. – बेकायदेशीर काही सभासदांना मतदानाचा हक्क काढून घेण्याचा मानस ठेवला आहे.. – अनिकेत चराटी.

आजरा शेतकरी संघाच्या विद्यमान संचालक मंडळाने. – बेकायदेशीर काही सभासदांना मतदानाचा हक्क काढून घेण्याचा मानस ठेवला आहे. – अनिकेत चराटी.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ आजरा या प्रवर्गातील सन. २०२२/२७ सालच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम लागला असून सदर निवडणुकीसाठी सर्व वैयक्तिक सभासदाची नांवे मतदार यादीत समाविष्ट केली नसल्याचे समजते या अनुषंगाने आण्णा भाऊ शेतकरी सुतगिरणीचे संचालक अनिकेत चराटी यांनी प्रसिद्धी पत्रक काढले असून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कि
आजरा तालुक्यातील आजरा शेतकरी खरेदी विक्री संघ मर्या. आजरा हि शेतकरी वर्गाची संस्था असून सदर संस्थेमध्ये वैयक्तिक सभासद हे मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जवळपास ९ ते १० हजार सभासद होते. मागील निवडणुकीत या सभासदांना मतदानाचा अधिकार होता. सद्यस्थितीत विद्यमान संचालक मंडळाने सहकार कायद्याचा चुकीचा अर्थ काढून बेकायदेशीर एकतर्फी सभासद फि हि रक्कम १०० रु वरुन ५०० रु. केली व ती वाढीव फि भरण्याबाबत कोणत्याही सुचना दिलेली नाही. ठराविक वैयक्तिक सभासदांनी सभासद फि हि रक्कम रु १०० रु वरून ५०० रु केलेची सुचना न मिळाल्यामुळे त्यांनी सदरची रक्कम भरलेली नाही. म्हणून संस्थेच्या अनेक सभादाची नांवे मतदार यादीतून वगळलेली आहेत. त्यामुळे सदर सभासदांना मतदान करणे पासून वंचित ठेवण्याचा मानस दिसतो. तरी सदर रद्द केलेली नांवे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी सहा. निबंधक सहकारी संस्था यांचेकडे सर्व वैयक्तिक सभासदांना मतदान करण्याचा अधिकार मिळावा. अशा अशयाची तक्रार दिली आहे.
तसेच रवळनाथ वि. सेवा संस्था हात्तीवडे, अबदुल हमीद सेवा संस्था सावरवाडी, महात्मा फुले सेवा संस्था सुळे, हिंद माता सेवा संस्था लाकुडवाडी, या संस्थेचे बोगस ठराव दिले असलेबाबतची तक्रार दिली आहे. यावेळी सोबत जयवंतराव शिंपी व अशोक चराटी सोबत असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात अनिकेत चराटी यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.