आजरा गवसेत आरोग्य केंद्राचे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न. ( ६ कोटी ६४ लाखाचा निधी मंजूर. )
आजरा. – प्रतिनिधी.
गवसे तालुका आजरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे. यासाठी मागील अनेक वर्षापासून आम. प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न करुन अखेर ६ कोटी ६४ लाखाचा निधी मंजूर करत या आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज दि. १७ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते. प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी यशवंत सोनवणे यांनी केले. या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अनेक वेळा विभागातून अनेक वेळा मागणी होत होती. यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राचा ग्रामीण भागातील जनतेला लाभ मिळणार आहे. येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. यावेळी आम. प्रकाश अबिटकर म्हणाले सर्वाच्या पाठपुराव्याने हे प्राथमिक आरोग्य केंद्र उभे होणार आहे. रस्ते वीज, पाणी सह प्रथम आरोग्य सेवा हि सेवा म्हत्वाची आहे. सर्पनालाचे पाणी पूजन कार्यक्रम लवकरच हाती घेणार असल्याचे यावेळी आम. श्री.अबिटकर यांनी सांगितले तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार सर्वांनी एकत्र राहून चांगल्या पद्धतीने तालुक्याच्या विकासासाठी काम करूया असे शेवटी बोलताना आबिटकर म्हणाले.
या उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा बँकेची संचालक सुधीर देसाई, माजी सभापती उदयराज पवार, सौ. रचना होलम पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उप. नगराध्यक्षा अस्मिता जाधव, गवसे सरपंच सोनाली पाटील तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी दाजी दाईगडे, तालुका आरोग्य अधिकारी यशवंत सोनवणे, येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आभार गवसे सरपंच सोनाली पाटील यांनी मानले.