रिनाज मुश्ताक पठान मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती. – कोल्हापूरची सुकन्या पुणे प्राधिकरणची मुख्य अभियंता.
कोल्हापूर – प्रतिनिधी.

पुणे महानगर विकास प्राधिकरणाने अधीक्षक अभियंता व कोल्हापूरच्या सुकन्या इंजिनियर रिनाज मुस्ताक पठाण यांना महाराष्ट्र शासनाने मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती दिली आहे. पदोन्नतीनंतर त्यांची नियुक्ती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे मुख्य अभियंता म्हणून करण्यात आली आहे. श्रीमती पठाण यांनी वरील पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती होऊन सुरुवातीला श्रीमंती पठाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून रुजू होऊन कार्य केले मागील काही वर्षांपासून त्या प्रतिनियुक्तीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कार्यरत आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे मुख्य अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारतात श्रीमती पठाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
