पश्चिम बंगालच्या निवडणुकी नंतर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ.- आजरा भाजपने केले निषेध आंदोलन.
आजरा प्रतिनिधी.दि. ५
आजरा येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर
भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार व भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशानुसार युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते ५ में रोजी आजरा येथे आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकीचे निकाल तृणमूल च्या बाजूने लागल्यानंतर ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक यांच्या घरावर ,कार्यालयावर हल्ले, जाळपोळ होत आहे. कार्यकर्त्यांना मारहाण होत आहे.
याचा निषेध करण्यासाठी दि ५ मे रोजी भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार होते.
भाजयुमो ने आपल्या जिल्ह्यात भाजप पदाधिकारी आपले कार्यालय अथवा घराबाहेर सोशल डिस्टन्स चे नियम पाळून आंदोलन करावे या आदेशानुसार आजरा येथील कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार सह पदाधिकारी उपस्थित होते.
