चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा चिरुन केला खून.- पती अटकेत.
वडगाव. – प्रतिनिधी.
मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोटावर धारदार विळ्याने सपासप वार करून तसेच गळा चिरुन खून केला. खून करुन पती हातकणंगले पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्यासुमार गावाबाहेरील शेतवडीतील सुतार पांणद येथे घडली.
पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की मयत पत्नीचे नाव कविता चंद्रकांत कोरवी (वय ३२) व आरोपी पती चंद्रकांत कोरवी (वय ४०, दोघेही रा. मुळगाव निमशिरगाव, ता. शिरोळ, सध्या रा. मौजे वडगाव) असे आहे. त्यांना दोन मुले असून यातील एक मुलगा मौजे वडगावात तर दुसरा मुलगा निमशिरगाव येथे असतो. चंद्रकांत हा आजोळ म्हणजे मौजे वडगाव येथे भोसले यांच्या घरी रहात होता. दोघेही गावात शेतमजूरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होते. दोघांच्यात वारंवार वाद होत होते. चंद्रकांत कविताच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहाण करत असे.