Homeकोंकण - ठाणेदिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश.- MRPपेक्षा अधिक किमतीने विकता येणार नाहीत कोरोनासंबंधित औषधे,ऑक्सिजन.

दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश.- MRPपेक्षा अधिक किमतीने विकता येणार नाहीत कोरोनासंबंधित औषधे,ऑक्सिजन.

दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश.- MRPपेक्षा अधिक किमतीने विकता येणार नाहीत कोरोनासंबंधित औषधे,ऑक्सिजन.

नवीदिल्ली. वृतसंस्था.

राजधानी दिल्लीत सध्या करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे राजधानीत आता मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा तसंच औषधांची कमतरता भासू लागली आहे. अशातच आता दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
ऑक्सिजन सिलेंडर्स, फ्लो मीटर्स आणि कोरोनाच्या उपचारांसाठी आवश्यक औषधे आता एमआरपीपेक्षा जास्त किमतीला विकली जाणार नाहीत यावर लक्ष ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत.

देशात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत असून मृतांची संख्याही वाढत आहे. आज सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासांमध्ये देशात ८०हजार ९३४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा आता ३३लाख ४९ हजार ६४४वर पोहोचला आहे. तर ३ लाख ७ हजार ८६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात काल दिवसभरात एकूण ३,६८९ मृतांची नोंद झाली.

दरम्यान, दिल्लीत शनिवारी एका रुग्णालयातील डॉक्टरसह १२ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला, तर गुजरातमध्ये एका रुग्णालयात लागलेल्या आगीत १८ जणांचा बळी गेला. त्यापैकी १६ कोरोना रुग्ण होते. दिल्लीस्थित बत्रा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तेथील प्राणवायूचा साठा शनिवारी संपल्यामुळे आठ रुग्णांचा मृत्यू झाला. तर गुजरातच्या भडोच जिल्ह्यातील पटेल वेल्फेअर रुग्णालयात शनिवारी सकाळी घडली. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत दोन कर्मचारी आणि १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.