मला जिल्हा बँकेचा चेअरमन करण्यासाठी स्व. राजारामबापूंचे योगदान. – माजी मंत्री. हसन मुश्रीफ.
( स्व. राजारामबापू देसाई स्मृतीदिन
विविध कार्यक्रमांने संपन्न.)
आजरा. – प्रतिनिधी.
मला जिल्हा बँकेचा चेअरमन करण्यासाठी स्व. राजारामबापूंचे योगदान होत. स्व राजारामबापू देसाई त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक फाउंडेशनचे उपाध्यक्ष युवराज पोवार यांनी केले.
पुढे म्हणाले स्व. राजाराम बापूंनी नोकरीच्या काळात बाजार मांडला नाही. सहकार टिकले पाहिजेत यासाठी काम केले शेतकरी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम करून गेले खरेदी विक्री संघ आजही चांगल्या पद्धतीने चालू आहे. सहकारात राजाराम बापूंचे काम कौतुकास्पद होतं. असे श्री मुश्रीफ बोलताना म्हणाले
स्वर्गीय राजारामबापू मागे चांगले विचार ठेवून गेले यामुळे त्यांचं नाव समाज काढतो. – प्रा. पी. डी. पाटील.
प्रा. पी. डी. पाटील प्रमुख वक्ते होते श्री पाटील बोलताना म्हणाले विचारांची देवाण-घेवाण करायची असेल तर विविध कार्यक्रमाला एकमेकांना पुस्तक भेट दिली पाहिजे ज्यांच्याकडे विचार आहे. त्यांच्याकडून खूप काही घेण्याकरता असतं पण मागे विचार ठेवून गेलेल्या व्यक्तीचं गेल्यानंतरही मागे समाज नाव काढतो व संपत्ती ठेवून गेलेल्या व्यक्तीचं फक्त वारस नाव काढतो. यासाठी संपत्ती सोबत समाज्याने नाव काढले पाहिजे असे समाज उपयोगी काम जीवनात करावे. पुस्तकच माणसाला घडवते यासाठी पाल्यांनी आपल्या मुलांना अभ्यासासोबत पुस्तक वाचण्यास दिली पाहिजे व व स्वतःही वाचन केलं पाहिजे.
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना माजी मंत्री हसन मुश्रीफ व मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, आजरा तालुका संघाचे माजी अध्यक्ष व आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक स्व. राजारामबापू देसाई यांचा पंधरावा स्मृतिदिन दिनांक १९ नोव्हेंबर विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनचे अध्यक्ष वृषाल हुक्केरी यांनी व फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी विविध उपक्रमाचे नियोजन केले होते. यामध्ये मलिग्रे व आजरा येथे रक्तदान शिबिर, फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्कार माजी ग्रामविकास मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकुंदराव देसाई, गोकुळचे माजी संचालक रवींद्र आपटे, विद्यमान संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष सौ. अस्मिता जाधव,सौ.रचना होलम, कॉ. संपत देसाई, संभाजी पाटील, सुधीर कुंभार, वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, अल्बर्ट डिसोजा, उदयराज पवार, सौ. कामिना पाटील, काशिनाथ तेली जनार्दन टोपले, राजेंद्र गड्ड्याणवर, राजेंद्र सावंत, नागेश चौगुले, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, अनिकेत कवळेकर, विविध सेवा संस्थेचे चेअरमन संचालक यांच्यासह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजरा खरेदी-विक्री संघाचे मॅनेजर जनार्दन बामणे यांनी आभार मानले