Homeकोंकण - ठाणेआजरा मुंगूसवाडीच्या प्रियांकाची स्पर्धा परीक्षेत बाजी . - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या...

आजरा मुंगूसवाडीच्या प्रियांकाची स्पर्धा परीक्षेत बाजी . – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक परीक्षेत यश.

आजरा मुंगूसवाडीच्या प्रियांकाची स्पर्धा परीक्षेत बाजी . – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक परीक्षेत यश.

आजरा,प्रतिनिधी.

पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत बाजी मारत आजरा तालुक्यातील मुंगूसवाडी येथील प्रियांका गुंडू सावंत हिने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक पदासाठीच्या परीक्षेत यश मिळविले. शेतकरी कुटुंबातील प्रियांकाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून निकाल जाहीर होताच प्रियांकाच्या घरी मुंगूसवाडी येथे जल्लोष साजरा करण्यात आला. प्रियांकाचे चौथीपर्यंतचे शिक्षण मुंगूसवाडी येथील प्राथमिक शाळेत झाले. तर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण तिने आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलमधून घेतले. गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बु।। येथे मामाच्या गावी राहून तिने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. तर येथील आजरा महाविद्यालयातून तिने शास्त्र शाखेची पदवी प्राप्त केली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचा निश्चय केलेल्या प्रियांकाने पदवीचे शिक्षण घेतानाच स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास सुरु केला. पदवी पुर्ण होताच तिने कोल्हापूर गाठले. तेथे अरुण नरके फौंडेशनच्यामाध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात प्रियांकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात आलेल्या दुय्यम निरीक्षक पदाच्या परीक्षेत यश संपादन केले. शुक्रवारी सायंकाळी निकाल जाहीर होताच प्रियाकांच्या घरी मुंगूसवाडी येथे जल्लोष साजरा करण्यात आला. संपुर्ण गावात उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. प्रियांकाला शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रमंडळींनी गर्दी केली होती. सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.