राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गावरील आजरा शिवाजीनगर येथील रहिवासींचे तहसीलदारांना निवेदन. – राष्ट्रीय महामार्गात अडचणीत होते वाढ. –
आजरा. – प्रतिनिधी.
राष्ट्रीय महामार्ग बाबत संकेश्वर ते बांदा येथील शेतकऱ्यांचा उठाव चालू असताना दुसरीकडे आजरा शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी यांनी आंदोलनाच्या हत्यार बाहेर काढल्यामुळे राष्ट्रीय महामार्गात अडचणीत वाढ झाली आहे. आजरा शिवाजीनगर येथील रहिवासी यांनी हैदराबाद गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सदर राष्ट्रीय महामार्गाचे काम आजारा शहरातून जाणार आहे. तरीही अद्याप या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रहिवासी यांना याबाबतची कल्पना किंवा नोटीस दिलेली नाही. अनेक वर्षापासून अनेक पिढीचे वास्तव्य या घरामधून गेलेले असताना सदर रस्त्याचे कामाचे नियोजन किंवा नोटीस याबाबतची कल्पना रहिवासना दिली जात नाही. यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावर निर्माण झाले असल्याने याबाबत संबंधित अधिकारी यांनी नेमकी भूमिका काय आहे. याबाबत शिवाजीनगर येथील रहिवासिनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे शुक्रवार दि. १८ रोजी तहसीलदार कार्यालय आजरा समोर रास्ता रोको करणे बाबतचे निवेदन बुधवार दि ९ रोजी आजरा तहसीलदार विकास अहीर यांना दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या रस्त्याबाबत आम्ही रहिवासी कोणतेही प्रकारचे भूसंपादन होऊ देणार नाही कारण येथील रहिवाशांचे उत्पन्नाचे साधन नाही येथील सर्वांचे धार्मिक अधिष्ठान असलेले ह. भ .प.पु श्री लक्ष्मणबुवा महाराज मोरसकर यांचे श्री विठ्ठल मंदिर साधारणता अडीचशे वर्षांपूर्वीपासून आहे व शिवाजीनगर पार कट्टा देखील शंभर वर्षांपूर्वीपासून आहे त्यामुळे येथील सर्व इमारती मंदिरे पाडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पूर्वी १९९९ साली आम्ही आमची घरे पाडून रस्त्यासाठी सहमतीने विना मोबदला जागा दिलेली आहेत त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आम्हाला रस्ता परत वाढवला जाणार नाही याची लेखी हमी दिली होती. प्रस्तावित महामार्गाची नेमकी माहिती मिळावी शिवाजीनगर भागात नेमकी किती जागा काढण्याचा प्रशासनाचा विचार आहे हे आम्हाला लेखी स्वरूपात मिळणे आवश्यक आहे तसेच तहसीलकार्यास ते संभाजी महाराज चौक एवढ्या मार्गावर एकेरी मार्ग वाहतूक करण्यात यावी म्हणजे भूसंपादन करावे लागणार नाही या आमच्या प्रमुख मागण्या आहेत जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या नाहीत तर याबाबत शिवाजीनगर येथील रहिवासी आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत. यावेळी संबंधित महामार्गाची निगडित असलेले अधिकारी जे रस्ता करणार आहेत ते कॉन्टॅक्ट या सर्वांनी उपस्थित राहावे व सदर रस्ता दांडगाव्याने भूसंपादन करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आत्मदहन करू असा इशारा या निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे. या निवेदनावर गणपतराव डोंगरे, शिवाजी गुडुळकर, संभाजी पाटील, संजय डोंगरे, अभय जोशी, प्रमोद सावंत, समीर मोरजकर, अरविंद पाटील, सुरेश हरमलकर, दत्तात्रय मोहिते, राजेंद्र कदम, कृष्णा पाटील, दीपक बल्लाळ, लक्ष्मण बनसोडे, मानसिंगराव देसाई, सुधीर जाधव, बशीर खेडेकर, प्रकाश देसाई ,राहुल गवळी, रोहन सडेकर, अभिजीत नाईक, विनायक इंगळे, सुयोग सुतार शिवाजीराव इंजन, विवेक बिल्लेसह शिवाजीनगर मधील सर्व रहिवासी यांच्या सह्या आहेत.
