Homeकोंकण - ठाणेअखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू अकॅडमी आयोजित. - पोलीस भरती...

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू अकॅडमी आयोजित. – पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन संपन्न.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू अकॅडमी आयोजित. – पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन संपन्न.

पुणे. – प्रतिनिधी.


अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू अकॅडमीच्या वतीने पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन श्री. अविनाश पाटील संचालक, चव्हाण करिअर अकॅडमी पुणे व मा.सौ.प्रमिलाताई गायकवाड सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद यांच्या शुभ हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना प्रमिलाताई गायकवाड यांनी संस्थेचे अध्यक्ष मा.शरद पवार साहेबांचे विचारातून सुरु झालेल्या राजर्षी शाहू अकॅडमीच्या माध्यमातून बहुजन समाजातील गरीब, होतकरू युवक युवतींचा या भरती प्रक्रियेमध्ये समावेश व्हावा या हेतूने हे मोफत प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. अनेकांचे पोलीस होण्याचे स्वप्न असते आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करण्याची त्यांची तयारी असते. पण ही तयारी नेमकी कशी करावी याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या अडचणींचा सामना कायम करावा लागतो. मैदानी प्रशिक्षण व लेखी परीक्षा या बाबत कल्पना नसते.त्या अनुषंगाने या प्रशिक्षण केंद्रामध्ये युवक युवतींना पूर्ण प्रशिक्षण आणी लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शन करून त्यांची सर्व तयारी करून पोलीस भरतीस पात्र होण्यासाठी तज्ञ प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी सुसज्ज ग्रंथालय, क्लासरूम, इंटरनेटस सुविधा, सरावासाठी मैदान या गोष्टी विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणार आहेत. लेखी परीक्षे बरोबर मैदानी चाचणी वर हि भर देणे गरजेचे आहे या साठी सकस आहार, नियमित व्यायाम या कडे लक्ष द्यावे. वर्दीचा आब राखण्यासाठी स्वच्छ सतशील चारित्र्य व पारदर्शी व्यक्तिमत्व विकसित करा. त्याचबरोबर कोणत्याही भूल थापांनाबळी न पडता शारीरिक व बौद्धिक मेहनतीच्या जोरावर पोलीस व्हावे असे अवाहन या प्रसंगी केले. श्री अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोलीस भारती प्रक्रिया व त्या मध्ये झालेले बदल,अभ्यासक्रम, वेळेचे नियोजन, या सोबतच विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयारी त्या साठी करावी लागणारी मेहनत, या विषयी मार्गदर्शन करून आई वडीलांचे कष्ट व परिस्थितीची जाणीव ठेऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवा यश नक्कीच मिळेल असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ९२ युवक युवती प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमासाठी श्री.अविनाश पाटील ,मा.सौ.प्रमिला गायकवाड, खजिनदार विजयसिंह जेधे, डॉ. विलास पाटील,डॉ.सुदाम शेळके, डॉ. नवनाथ सरोदे, प्रा.गणेश मधे,प्रा.शेरमळ शेंडे, सुजित मेढेकर, राजश्री जाधव आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ.विलास पाटील प्र. प्राचार्य श्री.शाहू मंदिर महाविद्यालय यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.सुदाम शेळके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.दिपक गायकवाड यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.