आनंदाचा शिधावाटप होणार तरी कधी लाभार्थी प्रतिक्षेत – नियोजनाचा अभाव. ( आजरा तालुक्यात अंतोदय व प्राधान्य कुटुंबातील एकूण लाभार्थी २० हजार ६६६ )
आजरा. – प्रतिनिधी.
शासनाने आनंदाचा शिधा अंत्योदय, प्राधान्य रेशनकार्ड लाभार्थी यांना दिपावली निमित्ताने भेट म्हणून साखर, रवा, पामतेलासह चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याची घोषणा केली. पण अद्याप राज्यातील काही भागात भेट पोहोचल्याचे समजते पण आजही ग्रामीण भागातील लाभार्थी पंर्यत हि शासनाची आनंदाची शिधा भेट न पोहचल्याने लाभार्थीचा नाराजीचा सूर पुढे येत आहे. आजरा तालुक्यात अंतोदय व प्राधान्य कुटुंबातील एकूण लाभार्थी २० हजार ६६६ आहेत. अद्याप भाऊबीजेनंतर तरी या लाभार्थीपर्यंत पोहचेल अस वाटत होत. पण शासनाने मोठ्या प्रमाणात केलेली घोषणा व जाहिरात ही फक्त घोषणाच होती. की प्रसिद्धीसाठी अट्टाहास होता. जिल्ह्यातील सद्या काही पुरवठा विभागामध्ये रवा व पामतेल प्राप्त झाले असल्याचे समजते परंतु जाहीर केलेल्या सर्वच वस्तू अद्याप पुरवठा विभागातच न पोहोचल्यामुळे रेशन दुकानदार लाभार्थ्यांना काय देणार कदाचित शासनाने केलेले घोषणाही फक्त घोषणा नसून ती लाभार्थ्यांपर्यंत शिधा पोहोचणार आहे. परंतु दिपवालीसाठी दिली जाणारी ही शिधा कदाचित धाकट्या दिपवालीनंतर देखील मिळू शकते यासाठी लाभार्थ्यांनी गडबड करू नये अशाही चर्चेना होत आहेत. या शिधा वाटपाच्या नियोजनात नियोजनाचा अभाव दिसत आहे. परिपूर्ण नियोजन न करता घोषणा केली का ? राज्यातील काही भागात शिधावाटप वगळता आजपर्यंत शिधावाटप ग्रामीण भागात पोहोचलेले नाही. यामुळे किमान दिपवाळीनंतर का असेना आपण केलेल्या घोषणा फक्त कागदावर व अल्प लाभार्थ्यांच्या पर्यंत न पोहोचता राज्यातील सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावा अशी मागणी लाभार्थ्याकडून होत आहे. परंतु यासाठी प्रशासनाकडून हा आनंदाचा शिधा लवकर लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न झालेला दिसत नाही. परंतु अशा काही घोषणा करण्यापूर्वी त्याचे नियोजन करावे असं सरकारला सर्वसामान्य नागरिकांनी, लाभार्थ्यांनी सांगणे किंवा चर्चा होणे ही खेदजनक बाब आहे.
