आजरा साखर कारखान्याचा हंगाम २०२२-२३ करीता.३०००/ प्रमाणे ऊस बिल जाहीर.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२२/२३ करीता आवश्यक मशीनरीची कामे पुर्ण होवून कारखाना गळीतास सज्ज आहे. कारखान्यास आवश्यक बिड भागातील १५० पर्यंत यंत्रणा हजर झाली असुन उर्वरीत यंत्रणा लवकरच हजर होणार आहे. कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील वाहतुक यंत्रणेचे करार झालेप्रमाणे सदर स्थानिक यंत्रणा कार्यरत झाली आहे. कारखन्याने कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील नोंदविलेला संपुर्ण ऊस वेळेत उचल करणेसाठी आवश्यक ते सर्व नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे येणा-या ऊसाचे संपुर्ण बिल रू.३०००/- प्रति मे.टना प्रमाणे वेळेत कोल्हापूर जिल्हा मध्य बँकेच्या सहकार्याने आदा करणेचे नियोजन करून ४ लाख ५० हजार मे. टनाचे उदिष्ठ ठेवले आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने गळीतास सुरूवात होत असलेने कारखान्याने ठरविलेल्या ४ लाख ५० हजार उदिदष्ट पूर्ण करणेकरीता कारखान्याकडे कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील सर्व उस उत्पादक शेतकरी बंधुनी आपला संपूर्ण ऊस आमच्या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे अवाहन कारखान्याचे चेअरमन सुनिल शिंत्रे यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन आनंदा कुलकर्णी, संचालक अशोक चराटी, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संचालक मुकुंदराव देसाई, मधुकर देसाई, दिगंबर देसाई, मारूती घोरपडे, संचालिका सौ. सुनिता रेडेकर, लक्ष्मण गुडुळकर, दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, अनिल फडके, मलिककुमार बुरूड, जनार्दन टोपले, आनंदा कांबळे, तानाजी देसाई, विलास नाईक, कार्यकारी संचालक डॉ. टी. ए. भोसले, सेकेटरी व्यंकटेश ज्योती, मुख्य शेती अधिकारी समिरकुमार व्हरकट व अधिकारी उपस्थित होते.
