अहमदनगर जिल्हयाचे नुतन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्वीकारला कार्यभार.
अहमदनगर. – प्रतिनिधी.
अहमदनगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांची अहमदनगर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नूतन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे स्वागत करून कार्यभार सोपावला.
नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक असलेले राकेश ओला यांची अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. शनिवारी राकेश ओला यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस पदाचा कार्यभार स्वीकारला.
यावेळी उपस्थित पोलीस उप अधिक्षक अनिल कातकाडे,स्थानिक गुनहे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवाली चे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, भिंगारचे शशीकुमार देशमुख, अहमदनगर तालुका पोलीस ठाण्याचे राजेंद्र सानप, एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्याचे युवराज आठरे इत्यादी आदी सर्व वरिष्ठ आधिकारी, पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते