Homeकोंकण - ठाणेखंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी विद्यापीठ,आयुकातर्फे कार्यक्रम

खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी विद्यापीठ,आयुकातर्फे कार्यक्रम

खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी विद्यापीठ,आयुकातर्फे कार्यक्रम

पुणे :- वेधशाळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र यांच्यातर्फे उद्या मंगळवार दि.२५ ऑक्टोबर होणारे खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यापीठाचे क्रीडांगण येथे ग्रहण पाहण्यासाठी दुर्बीण, कॅमेरा आणि खास आवरण असलेले चष्म्यांद्वारे सर्वसामान्य पुणेकरांना ग्रहण पाहता येणार आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. त्यातही सूर्याचा काहीच भाग चंद्राकडून झाकला जातो तेव्हा ते खंडग्रास सूर्यग्रहण असते.

ग्रहण ही दुर्मीळ घटना मानली जाते. त्यामुळे त्याचे वैज्ञानिक महत्त्व असते. मंगळवारी सायंकाळी चार वाजून ५१ मिनिटांनी सुरू होणारी ग्रहण स्थिती सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे. या खंडग्रास सूर्यग्रहणावेळी सूर्याचा २३ टक्के भाग व्यापला गेलेला असेल. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना ग्रहणस्थिती पाहता येण्यासाठी विद्यापीठ आणि आयुका यांच्यातर्फे विद्यापीठाच्या क्रीडांगणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रहण काळात सूर्याकडे उघड्या डोळ्यांना पाहणे धोक्याचे असल्याने दुर्बीण, कॅमेरा आणि खास आवरण असलेले चष्मे उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती विद्यापीठाने दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.