डॉ. सातोसकर म्हणजे अवलिया व्यक्तिमत्व. ३७ वर्ष वैद्यकीय सेवा- अशोक चराटी.
( डॉ. दिपक सातोसकर ६१ वा. वाढदिवस उत्साहात साजरा. )
आजरा. – प्रतिनिधी.
डॉ. दिपक सातोसकर हे एक अवलिया असणारे व्यक्तिमत्त्व आहे. लहानापासून – थोरापर्यंत सर्वांना सोबत घेऊन सामाजिक बांधिलकी जपत आपला पेशा जपतात. त्यांच्याकडे जाणारा पेशंट हा त्यांच्याशी बोलतानाच अर्धा बरा होतो हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. चराटी कुटुंबामध्ये लहानपणापासून घरचे संबंध आहेत. अण्णाभाऊ संस्था समोरच्या वतीने त्यांची ६१ वी साजरी करत असताना आनंद होत आहे. त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा असे वाढदिवस सोहळा प्रसंगी बोलताना अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख श्री चराटी म्हणाले. वाढदिवस सोहळा समितीच्या अध्यक्षस्थानी श्रीमती अन्नपूर्णा चराटी होत्या. स्वागत विलास नाईक यांनी केले, प्रास्ताविक आजरा अर्बन चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी केले. वाढदिवसानिमित्त शुभेच्छाला उत्तर देताना डॉ. दीपक सातोसकर यांनी आपल्या जीवनातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक प्रवास सांगितला ते म्हणाले की प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे आजरा येथे झाले आजरा हायस्कूल येथे दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाला माध्यमिक चांगले यश प्राप्त झाले महाविद्यालय शिक्षणामध्ये बारावी सायन्स जुनियर कॉलेज उत्तीर्ण होऊन शॉर्ट टर्म मेडिकल कॉलेजमधून डिप्लोमा इन मेडिसिन अँड सर्जरी डिस्टिंगशन सह प्रथम क्रमांक प्राप्त केली. पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालय एमबीबीएस ची डिग्री मिळवली व १९८५ साली वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. गेली ३७ वर्ष वैद्यकीय सेवेत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर अण्णाभाऊ यांच्या सहकाऱ्यांनी १९८८ च्या कालावधीत आजरा ग्रामपंचायत मध्ये सदस्य पदी निवड, जनता शिक्षण संस्था आजरा येथे संचालक दि आजरा अर्बन को-ऑफ.बँक चेअरमन पदी चार वेळा निवडून सध्या विद्यमान संचालक म्हणून काम पाहत असून इंडियन मेडिकल असोसिएशनचे स्थापनेपासून २०२० पर्यंत उपाध्यक्ष आणि २०२० पासून अध्यक्ष पदाचा कार्यवाही सांभाळत आहे विकास सोसायटी ग्रुपचे संस्थापक चेअरमन ब्राह्मण विकास मंडळ आजाराचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. गजानन पतसंस्था आजरा संस्थापक असून अशा वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत सर्वांच्या सेवेत आहे. यावेळी कै. अजित चराटी यांच्या आठवणीचा उजाला डॉ. दीपक सातोसकर यांनी दिला. यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे सर्व संचालक भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकार
प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .सूत्रसंचालन भैया टोपले यांनी केले तर आभार वाढदिवस समिती अध्यक्ष यांनी मानले