Homeकोंकण - ठाणेदिवाळीला गालबोट!.. पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी. - गुदमरून प्रवाशाचा मृत्यू…

दिवाळीला गालबोट!.. पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी. – गुदमरून प्रवाशाचा मृत्यू…

दिवाळीला गालबोट!.. पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी. – गुदमरून प्रवाशाचा मृत्यू…

पुणे. – प्रतिनिधी.

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सध्या प्रचंड गर्दी होत आहे. गाडी फलाटावर चढण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरु होते. याच वेळी डब्यात चढताना एकजण खाली पडला आणि गर्दी त्याच्या अंगावरुन पुढे गेल्याने त्या प्रवाशाचा जागेवरच मृत्यू झाला. बौद्ध मांझी असे मृत प्रवाशाचे नाव आहे. रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानांनी बौध्द मांझी यांना तात्काळ उपचारासाठी लोहमार्ग पोलिसांकडे दिला. मात्र, त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे पॅसेंजरमध्ये ही घटना घडली आहे.

दरम्यान, रेल्वेच्या नोंदीनुसार, सणासुदीच्या काळात सर्वसाधारण डब्यात क्षमतेच्या चौपट आणि स्लीपर कोचमध्ये क्षमतेच्या दुप्पट प्रवासी बसलेले असतात. विशेष गाड्यांमध्ये जागा नसल्यामुळे प्रवाशांमध्ये भांडणेही होताना दिसतात. त्यामुळे अपघात होतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.