आज-यात कमी पटाच्या शाळा बंद विरोधात रणशिंग फुंकले. –
आजरा तहसीललर २७ आँक्टोंबरला जनआंदोलन.
आजरा :- प्रतिनिधी.
राज्य शासनाने २० पटसंख्येच्या आत शाळा बंद करण्यासंदर्भात सुरु केलेल्या हालचालीविरोधात येथील पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या मेळाव्यात रणशिंग फुंकले. यावेळी २७ आँक्टोंबर रोजी आजरा तहसील कार्यालयावर जनआंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी काँ.संपत देसाई.म्हणाले, शाळा बंद करणे म्हणजे जातीची उतरंड,सरंजामशाही घट्ट करणे हेच धोरण शासन घेत आहे.कोणत्याच सरकारने जनतेच्या बाजूचे शिक्षणाचे धोरण घेतले नाही.याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे.मुलींच्या शिक्षणाची दारे बंद करण्याचा शासनाचा उद्देश आहे.
संजय तर्डेकर म्हणाले,राज्यकर्ते घटनेचे पालन करत नाहीत.२००५ मध्ये शिक्षण हक्काचा कायदा आला तो आता मोडीत काढण्याचा हेतू शासनाचा आहे.स्वातंत्र्यानंतर पहिली पिढी शिकली ती सर्व शिक्षक झाले.पण ते जिल्हाधिकारी होऊ शकले नाहीत. शेतकऱ्यांची मुलं प्रथमवर्ग अधिकारी होणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे. घटना बदलण्याचे धोरण असून याविरोधात संघटीत होण्याची गरज आहे. यावेळी प्रा.डॉ. नवनाथ शिंदे, युवराज पोवार, गौतम कांबळे, युवराज जाधव,राजाराम पोतनीस यासह पालकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्यभर संघटीत लढा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी शिक्षक बँक संचालक धनाजी रावण,संभाजी बापट,रावसाहेब देसाई, कृष्णा सावंत,बळवंत शिंत्रे,सुनिल कामत,सुरेश देशमूख,रविंद्र दोरूगडे, वंदन जाधव यासह पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत मायकेल फर्नांडीस यांनी केले. प्रास्ताविक एकनाथ आजगेकर यांनी केले. सूत्रसंचालन उमाजी कुंभार यांनी केले.आभार प्रकाश तिबिले यांनी मानले.
