साखरेची फक्त निर्मिती करून साखर कारखाने चालणार नाहीत. – हे शिवधनुष्य पेलण्याचे अवाहन संचालक मंडळाला उचलले पाहिजे.- खास.प्रा.संजय मंडलिक ( २४ वा. गळीत हंगाम शुभारंभ संपन्न. )
आजरा. – प्रतिनिधी.
साखरेची फक्त निर्मिती करून कारखाने चालणार नाही. तर इथेलॉन, बिसलरी यातुन उत्पन्न देखील सोबत वाढवले पाहिजे. असे खासदार प्रा. संजय मंडलिक सोमवार दि. १७ रोजी आजरा साखर कारखाना २४ व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. स्वागत संचालक वसंतराव धुरे यांनी केले प्रास्ताविक चेअरमन सुनील शिंत्रे यांनी केले खासदार प्रा. श्री मंडलिक बोलताना पुढे म्हणाले आजरा साखर कारखाना सातत्यपूर्ण संचालक मंडळाने सुरू केला पण साखरेचा दर चांगला मिळावा म्हणून ऊस उत्पादक आग्रह धरतात परंतु साखर निर्मिती करून कारखाना चालत नसल्याने या स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर साखरेचे सर्व खर्च भागवणे सोपे झाले नाही. कारण अलीकडे साखरेची धोरणे बदलली आहेत ५० लाख टन साखर निर्यात होणे बाबत केंद्र शासन धोरण प्राप्त करत आहे एफ. आर. पी देताना कारखान्यांना अडचणी येत आहेत. परंतु हा शिवधनुष्य पेलण्याचे आवाहन संचालक मंडळाला उचलले पाहिजेत. व एकजुटीने कर्जाचा डोंगर न उभा करतात देणी भागवून कारखाना नफ्यात येण्यासाठी प्रयत्न करावे. संकेश्वर बांदा चालू होणार असलेल्या महामार्ग हा २८९ कोटीचा आहे. सद्या या मार्गावर खड्डेच खड्डे असून कारखाना चालू झाल्यानंतर फारच त्रासदायक रस्ता होणार असल्याने तात्पुती मलमपट्टी करण्याबाबत मी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार प्रा. श्री. मंडलिक यांनी गळीत हंगाम हंगाम शुभारंभ बोलताना म्हणाले. यावेळी
डॉ. आनंद उर्फ नृसिंह एकनाथ गोसावी महाराज. पीठाधीश बोलताना म्हणाले समाजासाठी काम करणारा हा राजा असतो पण खरा योद्धा तो असतो जो युद्ध टाळू शकतो नापीक जमीन सुपीक करणारा राजा असतो. हा कारखाना आजऱ्याची दौलत आहे. समाजकारण हा मूळ मुद्दा झाला पाहिजे. सर्व संचालकांनी एकत्र होऊन चांगल्या पद्धतीने कारखाना चालवला पाहिजेत व पुढील गणित हंगामात कारखान्यांमध्ये परिवर्तन झाले पाहिजेत यासाठी माझे आशीर्वाद सदैव आपल्या व कारखान्याच्या सर्वांच्या पाठीशी आहेत. पण कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजेत अशी माझी इच्छा असल्याचे त्यांनी आपली भावना यावेळी बोलताना व्यक्त केली. यावेळी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ म्हणाले आजरा साखर कारखाना मागील गळीत हंगाम पार पडला १२१ कोटी कर्ज असलेला हा कारखाना ५० कोटींने वाढला यासाठी कारखाना चालवत असताना यापुढे इथेनॉल निर्मिती करण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावे साखरेचे दर ३६ रुपये यामुळे कारखानदारी टिकू ही शकत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी साखरेचे दर वाढवले नसते कामगार पगार सह अनेक गोष्टी अडचणीच्या निर्माण झाल्या असत्या खासदार संजय मंडलिक यांनी सूचना केल्याप्रमाणे जिल्हा बँक इथेलॉन निर्मितीसाठी मदत करेल यापूर्वी जिल्हा बँकेने या कारखान्याला मदत केल्याबद्दल संचालक मंडळाचे धन्यवाद देतो. व चालू हंगामात ४ लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट गाटावे यासाठी शुभेच्छा यावेळी आमदार श्री मुश्रीफ यांनी दिल्या. सुत्रसंचालन एकनाथ गिलबिले यांनी केले तर आभार संचालक अनिल फडके यांनी मानले.

या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ. टी.ए. भोसले, सर्व संचालक तसेच मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्डाण्णवार, शिवसेना ता. प्रमुख युवराज पोवार सह सभासद, ऊस पुरवठावदार शेतकरी ठेविदार सामाजिक व राजकीय कार्यकर्ते कंत्राटदार व्यापारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
