Homeकोंकण - ठाणेअखेर लोटांगण घातलेच ! शिंदे गटाचा निवडणुकीपुर्वीच दारूण पराभव ! शिवसेना संपविण्याचा...

अखेर लोटांगण घातलेच ! शिंदे गटाचा निवडणुकीपुर्वीच दारूण पराभव ! शिवसेना संपविण्याचा विडा उचललेल्या शिंदे गटाला भाजपाचा प्रचार करण्याची नामुष्की !

अखेर लोटांगण घातलेच ! शिंदे गटाचा निवडणुकीपुर्वीच दारूण पराभव !शिवसेना संपविण्याचा विडा उचललेल्या शिंदे गटाला भाजपाचा प्रचार करण्याची नामुष्की !

मुंबई. – प्रतिनिधी.

दिलीप मालवणकर.
ज्येष्ठ पत्रकार
प्रचंड आटापिटा करून निवडणूक आयोगाकडून नाव व चिन्ह मिळवले.कारण काय तर अंधेरी पोटनिवडणूक लढवायची आहे. त्यासाठी शिवसेनेचे नांव व चिन्ह ही गोठवण्यास भाग पाडले.
भाजपा या पक्षाने सर्व प्रादेशिक पक्ष संपविण्याचा विडा उचलला आहे. शिंदेंच्या फुटीर गटात हवा भरून शिवसेने विरोधात फुगवले आहे. पण अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने सदर जागा शिवसेनेची असल्याने शिंदेंच्या फुटीर गटास भाजपा बहाल करेल व ख-या अर्थाने त्यांचा स्वतःचा आमदार विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊन एक प्रकारे शिंदे गटाला बळ देईल,असे वाटले होते.परंतू भाजपा हा कोणत्याही प्रादेशिक पक्षाला मोठे होऊ देणार नाही.शिंदे गटाला भाजपाचा आश्रीत ठेऊन मिंधेच ठेऊ इच्छित आहे. कारण शिंदे गट मोठा होऊ नये,यासाठी भाजपा रितसर प्रयत्न करीत आहे, स्वबळावर मोठ्या होऊ शकणा-या पक्षाची छाटणी कशी करायची हे भाजपाचे चाणक्य चांगल्या प्रकारे जाणतात.त्यामुळे शिंदे गटाला आपली शक्ति वाढवण्याची वा सिद्ध करण्याची पहिली वहिली संधी अंधेरी पोटनिवडणूकीच्या निमित्ताने चालून आली असताना भाजपाने अवसानघातकीपणा करून शिंदे गटा ऐवजी आयात केलेला मूरजी पटेल हा परप्रांतीय उमेदवार एक लाखाहून अधिक मराठी मतदार असताना लादला आहे.येथेही मोदींचा गुजरात फार्म्युला अंमलात आणला आहे.बाळासाहेब व दिघे साहेबांच्या नावाने दिवसरात्र जप करणारा शिंदे गटास आत्ता फरफटत भाजपाच्या मागे जाऊन आपल्या एका दिवंगत सहका-याच्या विधवा पत्नी विरोधात विखारी प्रचार करण्याची नामुष्की पत्कारावी लागणार असल्याने शिंदे गटाचा स्वाभिमानाचा मुखवटा खळ्ळकन गळून पडला आहे.

शिंदे गटाला मिळालेली ढाल व तलवार युद्धापुर्वीच म्यान झाली आहे.
निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण शिंदे गट या निवडणूकीपुर्वीच चारीमुंड्या चित्त झाला आहे. आत्ता शिवसेना संपविण्याचा विडा उचललेल्या भाजपाचा जयजयकार करावा लागणे ही फार मोठी शोकांतिका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.