भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एका शिष्टमंडळाने. – शिवसेनाप्रमुख ऊद्धवजी ठाकरे यांची मातोश्री बंगल्यावर भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला केला पाठींबा जाहीर.
मुंबई. – प्रतिनिधी.

महाराष्ट्र द्वेष्ट्या, हुकुमशाही, मनुवादी प्रवृत्तीच्या भाजपचा पराभव झाला पाहिजे. भाजपचे अध्यक्ष सर्व पक्ष संपवण्याची भाषा करत आहेत. ईडी,खोके वापरून महाराष्ट्रात शिवसेना सारखे प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे शिंदे + फडणविसांच्या ऊमेदवाराचा पाडाव करण्यासाठी शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतला आहे.
मा ऊद्धवजींनी पाठींब्याचे मन:पूर्वक स्वागत केले व तेथील स्थानिक नेत्यांना कम्युनिस्ट पक्षांशी संपर्क ठेवण्यास सांगितले.तसेच कामगारांच्या प्रश्नावर एकत्र संमेलन घेण्याचे सुचवले.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ.मिलिंद रानडे, कॉ.प्रकाश नार्वेकर, कॉ.बबली रावत,कॉ.बाबा सावंत,कॉ.विजय दळवी होते. त्यावेळी शिवसेनेचे अनिल परब, श्री.रवींद्र वायकर, अरविंद सावंत, सुनील प्रभू, रमेश कोरगावकर आणि मनीषा कायंदे हे नेते उपस्थित होते.