Homeकोंकण - ठाणेआरोग्यविषयक उपक्रम राबवून नेताजी पालकर व्यायाम शाळेच्या वतीने हनुमान जयंती साजरी.

आरोग्यविषयक उपक्रम राबवून नेताजी पालकर व्यायाम शाळेच्या वतीने हनुमान जयंती साजरी.

आरोग्यविषयक उपक्रम राबवून नेताजी पालकर व्यायाम शाळेच्या वतीने हनुमान जयंती साजरी…
गडहिंग्लज प्रतिनिधी:

गडहिंग्लज येथील नेताजी पालकर व्यायाम शाळा आणि त्याभोवतालच्या संपूर्ण परिसरामध्ये येथील व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यविषयक उपक्रम राबवून हनुमान जयंती साजरी केली.
हनुमान या शक्‍तीचा प्रतीक असणाऱ्या देवतेच्या जयंती निमित्ताने नेताजी पालकर व्यायामशाळा दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.पण कोरोनाच्या घडीमध्ये कोणत्याही स्पर्धांचे किंवा कार्यक्रमांचे आयोजन न करता आसपासच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करून व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांनी औषधाची फवारणी केली आणि एक आगळा-वेगळा उपक्रम साजरा करून लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृतीची मोहीम राबविली.यावेळी गडहिंग्लज नगरपालिका आरोग्य विभागाचे प्रमुख लक्ष्मण राठोड यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नेताजी पालकर व्यायामशाळेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान जयंतीचे औचित्य साधून व्यायाम शाळा व व्यायाम शाळेच्या सभोवतालचा परिसराची स्वच्छता करून तेथे औषधांची आणि सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली

नेताजी पालकर व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांनी जो स्तुत्य उपक्रम राबविला, त्याच पद्धतीचे आरोग्यविषयक उपक्रम राबवून जर गडहिंग्लज करांनी नगरपालिका आणि आरोग्य विभागाला सहकार्य केले तर नक्कीच कोरोनाच्या लाटेवर आपण लवकरच मात करू शकु अशी मला आशा आहे”असे मत यावेळी गडहिंग्लज आरोग्य विभागाचे प्रमुख लक्ष्मण राठोड यांनी मांडले.तर “शक्तीचं प्रतीक असणारा बजरंगबली आपणा सर्वांना कोरोना रुपी राक्षसाला नष्ट करण्याची शक्ती प्रदान करो असं आभार मानत असताना प्रा.. लता पालकर म्हणाल्या.”

यावेळी आरोग्य विभागाचे प्रमुख लक्ष्मण राठोड,प्रा.लता पालकर,रियाजभाई शमंजी,लक्ष्मण कंग्राळकर,सुनील कलाल,संदीप रोटे,संतोष चौगुले,अक्षय सुतार,चेतन कातकर,शरद आसबे,आकाश मोहिते,पृथ्वीराज नेताजी पालकर,तेजस भानसे,निखिल पवार,सचिन कांबळे,भैरु बारामती,राहुल खोत,दिनेश कुंभीरकर,अमर खोत,दिलावर अत्तार,विनायक शेटके यांसह व्यायामशाळेचे कार्यकर्ते हजर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.