दाभिल – मेढेंवाडी बंधाऱ्या नजीक हिरण्यकेशी नदी पात्रात पडून एकाचा मृत्यू.
आजरा. प्रतिनिधी.२७
आजरा तालुक्यातील दाभिल मेढेंवाडी बंधारा जवळ हिरण्यकेशी नदी पात्रात पाय धूत असताना पाय घसरून नदीपात्रात पडून विष्णू विठोबा ढोकरे वय ७७ रा. पारपोली ता. आजरा. यांचे दि. २७ रोजी दुपारी १२.३५ वा. निधन झाले असल्याची वर्दी आजरा पोलिसात श्रीपती विष्णू ढोकरे यांनी दिली आहे. ढोकरे हे मेढेवाडी येथील शेतात शेताकडे जात होते. अधिक तपास दत्ता शिंदे आजरा पोलीस करत आहे.