शिवसेनेने केले उंचगी धरणाचे पाणी पुजन. – धरणग्रस्तांना दिलेला शब्द पाळला. – प्रलंबित प्रश्नाचा देखील पाठपुरावा करणार – शिवसेना आजरा.
आजरा -.प्रतिनिधी.
शिवसेना आजरा तालुक्याच्या वतीने उचंगी धरणाचे पाणीपूजन तालुका प्रमुख युवराज पोवार यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला उचगी प्रकल्प पूर्ण होऊन पाणीसाठा झाला हे शिवसेनेने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याने यश आहे. प्रतिकात्मक घळ भरणी केल्यामुळे प्रशासन गतिमान झाले तसेच मागील महाविकास आघाडी सरकारने भरीव अशी आर्थिक तरतूद केल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला शिवसेनेने कोळींद्रे जिल्हापरिषदेतील जनतेला दिलेला शब्द पाळला तसेच शिवसेना खंबीरपणे प्रकल्प ग्रस्तांचे पाठीशी आहे. हा प्रकल्प पूर्ण होणे हे प्रकल्पग्रस्त आणि शिवसेनेचे यश आहे. असे मत श्री. पोवार यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, रियाज समनजी तालुकाप्रमुख राजेद्र सावंत, शहरप्रमुख ओमकार मद्याळकर,उपतालुकप्रमुख सुनील डोंगरे अनपाल टाकिलदार युवासेनेचे तालुका युवा अधिकारी महेश पाटील, दिनेश कांबळे, विष्णू रेडकर, दिनकर मागडुम, प्रकाश ढवळे, विक्रम मुटकेकर, रोहित शेंडे, सुयश पाटील, अजित कांबळे
