कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा आजच नोंद करा. – अन्यथा ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना खुर्चीत बसू देणार नाही. आजरा मडीलगेत मनसेची निदर्शने.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा मडिलगे येथील ग्रामपंचायत कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुक्याच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मडिलगे ग्रामपंचायत येथे चालू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा कामाबाबत. तक्रार असल्याबाबतची निदर्शने करण्यात आली. या योजनेसाठी गावातील रस्ते खुदाई करून एक महिना उलटला तरीही खुदाई केलेल्या तरी व्यवस्थित न भरल्यामुळे गावातील नागरिकांची गैरसोय झालेली आहे त्याचप्रमाणे वयोवृद्ध नागरिकांचे या खड्ड्यामधून पडून अपघात झालेले आहेत याचा जाब विचारण्यासाठी आजरा मनसे वतीने ग्रामपंचायत कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी संबंधित कंत्रालदारावर आजच फौजदारी गुन्हा नोंद करावा व संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत समावेश करण्याच्या सूचना केल्या जर संबंधित कंत्राद्वारावर आजच गुन्हा नोंद नाही केल्यास ग्रामसेवक सरपंच व सदस्य यांना खुर्चीत बसू देणार नाही असा इशारा श्री चौगुले यांनी दिला यावेळी तालुकाध्यक्ष अनिल निऊगरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील सुपल, जिल्हा अध्यक्ष महिला पूनम भादवणकर, तालुकाध्यक्ष सविता सावंत व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली त्याचप्रमाणे गावातील झालेल्या रस्त्याची दुरावस्था डागडुजीकरण येणाऱ्या पंधरा दिवसात करून घ्यावे ग्रामपंचायत मडिलगे सरपंच ग्रामसेवक यांनी संबंधित कंत्राटदारावर काळ्या यादीत टाकावे या प्रकरणी आजच गुन्हा दाखल करण्यासंदर्भात व रस्त्याची झालेली दुरवस्था डागडुजीकरण येत्या पंधरा दिवसात करण्याची लेखी आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी पत्राद्वारे दिली आहे. यावेळी तालुका उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, कमलेश येसादे, प्रकाश कांबळे, सचिव चंद्रकांत सांबरेकर, कामगार सेना अध्यक्ष विश्वास कळसकर, वि.सेना अध्यक्ष अश्विन राणे, सहकार सेना म्हंकाळी चौगुले, तसेच पदाधिकारी सुनील पाटील, वसंत घाटगे, छाया लोहार, शोभा कांबळे, चंद्रकांत इंगळे, प्रकाश भिऊंगडे, किरण भोसले, मायाताई देसाई, मनोहर रेडकर, शोभा सावंत, रूपाली सावंत, ओमकार भिऊंगडे, अंकुश लोहार, सुशांत पवार, कपिल अजगेकर, मुकुंद जाधव, अरुण देसाई तालुक्यातील सर्व शाखेचे शाखा अध्यक्ष पदाधिकारी मनसैनिक उपस्थित होते.

[ यावेळी मनसे पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिया मारून घोषणांनी परिसर दणाणून सोडला “हा भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर कोण रे पायतान मारा दोन रे”
या ग्रामपंचायत करायचं काय “खाली डोकं वर पाय” अशा घोषणा देत संबंधित कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी येत नाहीत तोपर्यंत कार्यालयाच्या दारातून उठणार नाही. असा निश्चय करत निदर्शने करत ठिया मारला. या ग्रामपंचायत वरील स्थापनेपासून आजपर्यंत पहिला मोर्चा व निदर्शने करण्यात आली आहेत. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. अखेर ग्रामपंचायत कंत्राटदारला काळ्या यादीत व फौजदारी गुन्हा दाखल करत असलेल्याचे लेखी आश्वासन दिले. ] [ आजरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ]