प्राथमिक आरोग्य केंद्र आजरा मलिग्रेत रूग्ण कल्याण समिती सभा संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मलिग्रेत
रूग्ण कल्याण समिती सभा संपन्न झाली. या आरोग्य केंद्रात
पन्नास टक्के कर्मचारी जागा रिक्त असूनही , शासकीय योजना, लसीकरण, अंतर्गत रूग्णाच्या सेवा देत, बाहेरूग्णाना सेवा देण्याचे कौशल्य व कार्य, या प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डाॅ. रविंद्र गुरव व त्याचे कर्मचारी स्टाफ याच्या वतीने केलेल्या कामचे कौतुक व अभिनंदन डाॅ.यशवंत सोनवणे तालूका आरोग्य अधिकारी यांनी केले. रूग्ण कल्याण समिती सभेच्या अध्यक्ष स्थानावरून डाॅ सोनवणे यांनी सर्व कर्मचाराना मार्गदर्शन केले. यावेळी डाॅ. रविंद्र गुरव यांनी मलिग्रे प्राथमिक आरोग्य केंद्रे नावारुपाला आणण्यासाठी माझ्या बरोबर माझा स्टाफ, रूग्ण कल्याण समिती, ग्रामपंचायत मलिग्रे, आशा वर्कर्स , उपकेंद्रातील डाॅक्टर, याचे नेहमीच सहकार्य असते. या ठिकाणी बाह्यरूग्ण शंभर च्या वर असते तसेच उपकेंद्र ,
अंगणवाडी, शाळा तपासणी , शासकीय योजना, लसीकरण व मासिक मिटींग या करीता दोन वैद्यकिय अधिकारी असणे गरजेचे आहे. येणारे रुग्णांची गैर सोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. यावेळी अहवाल वाचन व्हि एम हरेर यांनी केले. सरपंच शारदा गुरव माजी. सरपंच समीर पारदे काॅ.संजय घाटगे, शिवाजी भगुत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच शोभा जाधव, रेश्मा बुगडे, आरोग्य सहाय्यक जे सी भोईर श्रीमती जे आर बार्देसकर यांच्या सह आरोग्य सेवक, सेविका आशा व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत पी. ए. पाटील यांनी केले आभार जे. एस. बोकडे यानी मानले.