Homeकोंकण - ठाणेसिंधुदुर्गचे न्यायमूर्ती उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश होणार. एन. व्ही. रमणांकडून...

सिंधुदुर्गचे न्यायमूर्ती उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश होणार. एन. व्ही. रमणांकडून नावाची शिफारस.

सिंधुदुर्गचे न्यायमूर्ती उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश होणार. एन. व्ही. रमणांकडून नावाची शिफारस.

नवी दिल्ली. वृत्तसंस्था.

देशाचे पुढील सरन्यायाधीश कोण होणार हे स्पष्ट झालं आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी गुरुवारी (४ ऑगस्ट) देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश ए. व्ही. रमणा यांनी स्वतः गुरुवारी (४ ऑगस्ट) केंद्र सरकारला दिलेल्या आपल्या ३ ऑगस्टच्या शिफारस पत्राची प्रत न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांच्याकडे सोपवली.
केंद्रीय कायदा मंत्रालयाकडून ३ ऑगस्टला सरन्यायाधीशांच्या सचिवालयाला सरन्यायाधीशपदासाठी पुढील उत्तराधिकारी निवडण्याबाबत पत्रव्यवहार झाला होता. यानंतर प्रथेप्रमाणे सरन्यायाधीश रमणा यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून यू. यू. लळीत यांच्या नावाची शिफारस केली.
ए. व्ही. रमणा २६ ऑगस्टला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर लळीत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती लळीत ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील. तेही निवृत्त होण्याआधी अशाचप्रकारे पुढील सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस करतील

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.