Homeकोंकण - ठाणेबहुजन वंचित आघाडी आजरा संपर्क मेळावा व संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न.

बहुजन वंचित आघाडी आजरा संपर्क मेळावा व संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न.

बहुजन वंचित आघाडी आजरा संपर्क मेळावा व संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न.

आजरा प्रतिनिधी.

आजरा येथील बहुजन वंचित आघाडी आजरा तालुका कार्यकारणी बैठक होऊन राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्या कोल्हापूर जिल्हा प्रभारी अध्यक्ष डॉ. क्रांतीताई सावंत यांचा आजरा तालुका संपर्क दौरा झाला. यावेळी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा प्रभारी अध्यक्ष सौ सावंत यांनी उपस्थित सर्वांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले त्याचबरोबर डॉ.प्रकाश आंबेडकर यांना समजून सांगताना त्यांची भूमिका व वंचित समाजाप्रती असणारे निष्ठा यांचे वंचितांना सत्तेत बसवण्याची स्वप्न या सर्व गोष्टींचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला पदाधिकारी यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून त्यांना संघटन कौशल्य कसे असावे यासंबंधी मनमोकळी चर्चा केली त्यानुसार चर्चा दरम्यान जिल्हा परिषद ,पंचायत समिती समिती निवडणुका ताकदीनिशी लढवणार असल्याचे कार्यकरणी सदस्य व कार्यकर्ते यांनी निवडून या दृष्टीने तयारीला लागावे. असे आदेश दिला त्यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीचे उपाध्यक्ष रूपाली कांबळे तसेच महिला आघाडी जिल्हा महासचिव उज्वला खवरे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्तावित तालुका अध्यक्ष गौतम कांबळे यांनी प्रास्तविक केले व स्वागत तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष संदीप कांबळे यांनी केले. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे आजरा तालुका मार्गदर्शक अजयकुमार देशमुख उपाध्यक्ष विलास कांबळे महासचिव सर्जेराव कांबळे सचिव प्रवीण कष्यप, कोषाध्यक्ष अंकुश कांबळे, निरिक्षक गणपती कांबळे, आयटी प्रमुख सागर कांबळे, संघटक अविनाश कांबळे, संघटक मंगेश कांबळे, आजरा तालुका महिला आघाडी प्रीती कांबळे, सचिव वैशाली कांबळे, आयटी प्रमुख प्रियंका कश्यप, विद्या कांबळे, संपर्क प्रु भाग्यश्री कांबळे, महाराष्ट्र सचिव लता कांबळे, प्रसिद्धीप्रमुख अश्विनी कांबळे, सचिन रंजना कांबळे, वंदना भोसले तसेच जिल्हा कमिटी मेंबर प्रसिद्ध रशीद सिकलगार, जिल्हा परिषद महादेव कांबळे, जिल्हा सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यासाठी तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित उपस्थितांचे आभार भिकाजीराव कांबळे यांनी मांडले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.