संजय गांधी निराधार योजना सदस्य पदाचा. – राजीनामा. – शिवाजी आडाव. ( मी मातोश्रीला सोडणार नाही. बाळासाहेबाचा शिवसैनिक. )
आजरा. – प्रतिनिधी.
बाळासाहेबाचा शिवसैनिक म्हणून इतके मोठे पद असताना मला या संजय गांधी निराधार योजना सदस्य पदाची गरज असे वाटत नाही. निराधार महिलांना यापूर्वी पद नसताना मदत केली आहे. यापुढे हि करेन पण या विभागाचे आमदार ज्यानी माझी नेमणूक केली ते लोकप्रतिनिधी काही बोलत नसताना काही बगलबच्च्यांना चौकात चर्चा करतात शिंदे गटाचे काम कर नाहीतर राजीनामा दे. मी स्वाभिमानी शिवसैनिक आहे. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मातोश्रीला सोडून जाणार नाही. मी आजरा उप. ता प्रमुख पदावर काम करत आहे. पण माझी ओळख बाळासाहेबाचा शिवसैनिक म्हणून आहे. तीच राहणार पदासाठी लाचार होणार नाही. मला दिलेल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याची तोडे बंद करण्यासाठी असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शिवसेना उप. ता. प्रमुख शिवाजी आडाव यांनी म्हटले आहे. संजय गांधी निराधार योजना सदस्य पदाचा राजीनामा तहसीलदार विकास अहिर याच्या कडे दिला आहे. यावेळी ता. प्रमुख युवराज पोवार, विभाग प्रमुख दिनेश कांबळे उपस्थित होते.
