Homeकोंकण - ठाणे२२ वर्ष लढा चालू - मात्र अद्याप २१० धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही....

२२ वर्ष लढा चालू – मात्र अद्याप २१० धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. – आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे. – मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन.

२२ वर्ष लढा चालू – मात्र अद्याप २१० धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. – आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे. – मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
यांना निवेदन.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटना अध्यक्ष. शिवाजी गुरव. आरदाळ यांच्या नेतृत्वाखाली बावीस वर्ष धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडले असून धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळणे बाबतचे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.
आंबेओहळ धरणग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे यासाठी २२ वर्ष लढा चालू आहे मात्र अद्याप २१० धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यांना जमीन किंवा पॅकेज देऊन पुनर्वसन करावे लागणार आहे, मात्र अधिकारी वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत. ज्यांना राहत्या घरापासून आठ किलोमीटरच्या बाहेर जमीन मिळाली आहे त्यांना घरबांधणीसाठी भूखंड तयार असून ते वाटप केले जात नाहीत. वाटपामध्ये दुजाभाव केला जात आहे ,शेतकऱ्यांची संकलन दुरूस्ती केली जात नाही, जमीन पसंत केलेल्या धरणग्रस्तांना आदेश दिले मात्र कब्जा दिला जात नाही, सर्व धरणग्रस्तांना समान न्याय मिळत नाही, चिरीमिरी दिल्याशिवाय काम पूर्ण केले जात नाही अशी चर्चा आहे. पुन्हा पुन्हा कुरापत काढून काम अडवले जात आहे. आपण स्वतः लक्ष घालून धरणग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती. सदरचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र राज्य यांना आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटना वतीने दिले आहे. या निवेदनावर अध्यक्ष, आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटना शिवाजी गुरव.सह धरणग्स्ताच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.