जिल्हा परिषद पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया – माजी मंत्री हसन मुश्रीफ.
( आजरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात.)
आजरा. – प्रतिनिधी.

सत्ता गेली म्हणून कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने उभे राहून पंचायत समिती व जिल्हा परिषद वरती झेंडा फडकवण्यासाठी तयार रहावे असे अवाहन माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवार दि ५ रोजी आजरा येथील सेवा संस्था नूतन संचालकांचा सत्कार समारंभ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा प्रसंगी बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले.
सत्तेत असताना जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी यश आले कै बाबासाहेब कुपेकर यांनी सुरुवात केलेल्या बावीस वर्षांपूर्वी प्रकल्पांना मार्गी लावता आले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थकबाकी शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची तसेच नेहमीच कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देऊ याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निर्णय घेतला होता परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्षांमध्ये काही करता आलं नाही सध्या नूतन सरकारने नेहमीच कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण अनुदान द्यावे अशीही या निमित्ताने मागणी केली जिल्हा बँकेचे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. १५० कोटीचा नफा झाला असून २०० कोटी रुपये नफा व्हावा. यासाठी प्रयत्न चालू आहेत यासोबत उसाचे क्षेत्र वाढवण्यासाठी देखील प्रयत्न करणार व सत्ता गेली म्हणून घाबरू नका संघर्ष करत राहू व एक दिवस एकहाती सत्ता घेऊन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला देऊ असे यावेळी माजी मंत्री बोलताना म्हणाले. आम. राजेश पाटील म्हणाले सत्ता गेली म्हणून आम्ही डगमगणारे कार्यकर्ते नाही सहकार क्षेत्रातून मोठे झालो आहोत शेतकऱ्यांच्या हिताचे व सर्वसामान्य नागरिकां साठी आजपर्यंत चांगले निर्णय घेतलेले आहेत. यापुढेही चांगले निर्णय घेऊ धरणग्रस्तांचे रखडलेले प्रलंबित प्रश्नासाठी प्रयत्नाची पराकष्टा करू सहकार क्षेत्रासाठी जिल्हा बँक आपल्या पाठीशी उभी राहील आमच्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत आम्ही आहोत व दगा फटका देणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवू असेही बोलताना आम. श्री पाटील म्हणाले.
यावेळी माजी आमदार के. पी. पाटील यांनी संबोधित केले.
नूतन सर्व सेवा संस्थेचे संचालक मंडळाचा सत्कार प्रमुख पाहुणे, व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते करण्यात आला
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मुकुंदराव देसाई, कारखाना संचालक वसंतराव धुरे, माजी सभापती उदयराज पवार, विष्णुपंत केसरकर माजी सभापती रचना होलम, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा आजरा खरेदी विक्री संघाचे मॅनेजर जनार्धन बामणे, आजरा कारखान्याचे राष्ट्रवादीचे संचालक, आजरा खरेदी-विक्री संघाचे सर्व संचालक कार्यालयीन व्यवस्थापक, तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार श्री. बामने यांनी मानले.


चौकट.
नाळ जनतेशी.
केडीसीसीचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, सत्ता असो वा नसो. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहतील. कार्यक्रमाला आमदार हसन मुश्रीफ साहेब येणार म्हटल्यावर उभ्या मुसळधार पावसातही हजारोंची उपस्थिती आहे. जनतेचे हे प्रेम असंच राहील.
चौकट..
तर रस्त्यावर उतरू……..
श्री. मुश्रीफ म्हणाले, राजकीय अभिलावेशातून येणाऱ्या काळात जनतेची कामे होणार नसतील, गोरगरिबांवर अन्याय होणार असेल तर रस्त्यावर उतरू. लोकशाही मार्गाने धरणे, मोर्चे व आंदोलन करू