Homeकोंकण - ठाणेधामणे ग्रामपंचायतील इलेक्ट्रिक मोटर चोरी केलेला आरोपी. - आजरा पोलिसांच्या ताब्यात.

धामणे ग्रामपंचायतील इलेक्ट्रिक मोटर चोरी केलेला आरोपी. – आजरा पोलिसांच्या ताब्यात.

धामणे ग्रामपंचायतील इलेक्ट्रिक मोटर चोरी केलेला आरोपी. – आजरा पोलिसांच्या ताब्यात.

आजरा. – प्रतिनिधी.

धामणे ता. आजरा ग्रामपंचायत मधील आजरा पोलीस ठाणे गु.र.नं 10/6/2022 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संभाजी नामदेव गुरव ( ग्रामसेवक ) धामणे ता आजरा यांनी धामणे ग्रामपंचायत मालकीचे पंप हाऊस मधील 20,000 रू किंमत असलेली इलेक्ट्रिक मोटर दिनांक 01/06/2022 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वा मुदतीत अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याच्या तपास कामी मा. उपविभागीय अधिकारी सो गडहिंग्लज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः व सहाय्यक फौजदार बी.एस कोचरगी,पो.ना 294/जाधव, पो.ना 815/आंबुलकर, पो.काॅ 2640/अमोल पाटील यांनी 24 तासांमध्ये जलद गतीने तपास करून आरोपी नामे विजय अशोक गोसावी वय 19 राहणार लिंगनूर ता. कागल यास दि 01/07/2022 रोजी अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेली इलेक्ट्रिक मोटर 20,000 किमतीची व गुन्ह्यात वापरलेले वाहन TATA ACE कंपनीचे वाहन क्रमांक MH-08-H-8584 असे हस्तगत करण्यात आले आहे. अशी माहिती
सहा.पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.