सोमेश्वर सह. दुध संस्था खानापूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक २०२२ ते २०२७ बिनविरोध.
आजरा. – प्रतिनिधी.

श्री सोमेश्वर दूध संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली श्री सोमेश्वर दूध संस्थेचे विद्यमान संचालक यामध्ये १)श्री आप्पा गणपती जाधव, २)श्री रामचंद्र शंकर डोंगरे, ३)श्री विलास राजाराम गुरव, ४)श्री गौतम दत्तात्रय कांबळे, ५)श्री विठोबा गोपाळ तेंडुलकर, ६)श्री जॅकू मोती कुतिन्हो,७) संभाजी बाळू देसाई,८) तुकाराम यशवंत जाधव,
९)श्रीमती सुषमा सुभाष राणे,१०)श्रीमती लक्ष्मी पांडूरंग जाधव नुतन संचालकांचे स्वागत संस्थेच्या वतीने करण्यात आले. सोमेश्वर समूह कमिटी खानापूर सोमेश्वर समूहाचे अध्यक्ष संदीप रामचंद्र जाधव सदस्य प्रल्हाद राजाराम गुरव व धनाजी शंकर डांगरे. या कामी सहकार्य खानापूर गावातील सर्व ग्रामस्थ व मुंबई ग्रामस्थ व कासारशेत व सर्व कमिटी मेंबर तरुण मंडळाचे सहकार्य लाभले.