पेरणोलीत विधवा प्रथा बंदीचा निर्णय. –
विशेष ग्रामसभेत मंजुरी,ग्रामपंचायत उपक्रम घेणार.
आजरा :- प्रतिनिधी.
पेरणोली ता आजरा येथे विधवा प्रथा बंद करण्याचा विशेष ग्रामसभेत निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच उषाताई जाधव होत्या. यावेळी ग्रामसेवक ज्ञानेश्वर काळे यांनी जिल्हा परिषदेचे विधवा प्रथा बंद करण्याबाबचे परिपत्रक वाचून दाखवले. त्यात हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करून समाजात नवा आदर्श निर्माण केला असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचे आवाहन केले. विधवा प्रथेमूळे महिलांची अवहेलना होऊन समाजात दुजाभाव केला जातो.त्यामूळे विधवा प्रथा ही माणूसपण नाकारणारी प्रथा असून ती बंद करण्याची मागणी कृष्णा सावंत यांनी केली.ग्रामपंचायतीच्या वतीने विधवांचा सन्मान करण्याचा उपक्रम घेण्याची सूचना सदस्य संदीप नावलकर यांनी केली.
यावेळी प्लास्टिक बंदी करण्याबाबत व सार्वजनिक ठिकाणे खुली करण्याचा,अन्नसुरक्षा योजना,शाळेची मोजणी आदीबाबत चर्चा झाली..चर्चेत माजी सभापती उदयराज पोवार,उपसरपंच उत्तम देसाई,ऊदय कोडक,बाबासाहेब लोखंडे आदींनी सहभाग घेतला.
याप्रसंगी सदस्या नंदा कांबळे, लक्ष्मी जोशीलकर, प्रियांका जाधव,राजू देसाई, भिमराव हळवणकर, शशिकांत सुतार,जयश्री वरेकर,शोभा फगरे,विमल कांबळे आदी उपस्थित होते.