पुढचे ३ आठवडे निर्णायक,
केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सावधतेचा इशारा
नवी दिल्ली.वृतसंस्था २०.
देशात सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी 2.50 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. खरेतर चांगली गोष्ट म्हणजे रविवारच्या तुलनेत यामध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात 2 लाख 56 हजार 828 लोक संक्रमित झाले आहेत. रविवारी 1.75 लाखपेक्षा जास्त लोक पॉजिटिव्ह आढळले होते. पहिल्यांदाच विक्रमी 1 लाख 54 हजार 234 लोकही बरे झाले. यापूर्वी एका दिवसात सर्वात जास्त 18 एप्रिलला 1.43 लाख लोक रिकव्हर झाले होते.
दुसरीकडे वाईट गोष्ट म्हणजे संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांचा आकडा 1.80 लाखांच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 लाख 80 हजार 550 लोकांनी जीव गमावला आहे. दररोजच्या मृतांच्या आकड्यामध्ये भारत देश पुन्हा एकदा टॉपवर गेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. ब्राझीलमध्ये सध्या दररोज जवळपास 1,500 लोकांचा मृत्यू होत आहे. तर अमेरिकेमध्ये हा आकडा 400-600 एवढा आहे. भारतात सोमवारी 1,757 रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी उच्च स्थरिया बाठक घेतली. यात सर्व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सहभागी झाले होते. यानंतर, कोरोनाविरोधातील लढाईत पुढील तीन आठवडे अत्यंत निर्णायक असतील, तसेच यादरम्यान प्रत्येकालाच अत्यंत सावध रहावे लागेल, असे डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले आहे.याशिवाय, त्यांनी सर्व राज्यांना, अॅडव्हान्समध्ये 3 आठवड्यांचे नियोजन करण्यास सांगितले आहे. तसेच गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी बाजारांमध्ये होत असलेली गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे.
