HomeUncategorizedविधवा प्रथा बंदीचा आजरा होनेवाडी ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर.

विधवा प्रथा बंदीचा आजरा होनेवाडी ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर.

विधवा प्रथा बंदीचा आजरा होनेवाडी ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर.

आजरा. – प्रतिनिधी.

होनेवाडी ता.आजरा येथील ग्रामपंचायत वतीने मंगळवार दि.२१ जून २०२२ रोजी आयोजित ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या नियमित विषयाबरोबर अनिष्ट विधवा प्रथा बंद करनेबाबतचा विषय चर्चेस घेण्यात आला. संबंधित विषयाबाबतची प्रचार प्रसिद्धी जनजागृती गावातील राजर्षि शाहू व्यायाम शाळेच्या वतीने आठवड्यापूर्वी घरोघरी जाऊन स्त्रियांना ग्रामसभेस येण्यासाठी जनजागृती करणेत आली.या अनुषंगाने २१ जून २०२२ रोजी ग्रा पं कार्यालय येथे आयोजित ग्रामसभेस महिलांची संख्या लक्षणीय होती. सदर सभेस कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रा पं तीने घेतलेल्या या अनिष्ट प्रथेबाबतच्या ऐतिहासिक निर्णयाचे वाचन व शासन निर्णय याची माहिती ग्रामसेविका राजगुरू यांनी दिली. समाजातील या अनिष्ट रूढी मुळे महिलांची होणारी अवेहलना स्त्रियांना मिळणारा मानसन्मान याबाबतीत ग्रा पं सदस्य कृष्णा पाटील यांनी विस्तृत व सविस्तर माहिती देत या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करत आपला होनेवाडी गाव हा समाजातील चांगल्या बदलासाठी नेहमीच एक पाऊल पुढे असल्याचे समस्त महिलांनी ग्रामस्थांनी दाखवून द्यावे असे आवाहन सदस्य पाटील यांच्याकडून करण्यात आले.
यानंतर सर्व उपस्थित ग्रामस्थ विशेषकरून महिलांनी सदर विषयाला आम्ही सर्वानुमते मंजुरी देत असून हा निर्णय अतिशय योग्य व क्रांतिकारक असून तो आम्ही सामाजिक जीवन जगताना पाळणार आहोत अशी शपथ घेणेत आली.
यानंतर नुकत्याच एका वर्षांपूर्वी पतीचे निधन झालेल्या गावच्या प्रथम नागरीक सरपंच प्रियांका चंद्रकांत आजगेकर यांनी आपले मनोगत मांडून या स्तुत्य निर्णयाचे स्वागत केले व याची अंमलबजावणी स्वतः पासून करण्याचे ठरवले या अनुषंगाने उपस्थित सर्व महिलांनी त्यांना हळद कुंकू लावून त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यात आले.व इथून पुढे अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्यात आल्याचे सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.