आजरा शहरात मोकाट कुत्र्यांचा थैमान. ( नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. – नागरिकांची मागणी.)
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा शहरात मोकाट कुत्र्यांनी थैमान मांडला असून काही कुत्र्यांना मालक असलेले व मोकाट कुत्र्यांनी शहरामध्ये झुंड फिरत आहेत. सध्या मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होत आहे. कुत्र्यांचे झुंड च्या झुंड बाजारपेठ, एस टी स्टॅन्ड सह मेश रोड गली – गल्लीतून हैदोस घालत फिरताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी एस टी स्टॅंडसमोर एका मोटर सायकल स्वारच्या कुत्र्यांचा झुंड अचानक आडवा आल्याने मोटर सायकल स्वार आणि त्याचा सोबती खाली पडून अपघात झाला. सुदैवाने जादा हानी झाली नाही. तरीसुद्धा एकाच्या हाताला तर दुसऱ्याच्या पायाला दुखापत झाली. मोटर सायकल चा वेग कमी असल्याने मोठा अपघात झाला नाही. गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही कित्येकदा झाला आहे. काहींच्या शेळ्यांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आजरा हा तालुका व गोव्याला जोडणारा मार्ग आहे. नेहमीच रहदारीचा मार्ग व तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक, शालेय विद्यार्थी यांची गर्दी असते. तरी या मोकाट कुत्र्यांचा आजरा नगरपंचायतीने लवकरात लवकर बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.