२० लाख लि. दुध पोहचवण्याचे संचालक मंडळाचे उदिष्ट. – गोकुळ चेअरमन विश्वासराव पाटील.
आजरा. – प्रतिनिधी.

२० लाख लि. दुध पोहचवण्याचे संचालक मंडळाचे उदिष्ट असल्याचे गोकुळ चेअरमन विश्वासराव पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघाच्या वतीने आजरा तालुक्यातील दुध उत्पादन वाढ आयोजित मेळाव्यात अध्यस्थानावरुन बोलत होते. श्री. पाटील म्हणाले पुर्वी गाईचे दुध कमी होते. सद्या म्हैस व गाय हे दुध ५०% ५०% आहे. पण यामध्ये दुधामध्ये वाढ होऊन दुध उत्पादकांना चांगला दर मिळावा. यासाठी आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात म्हशीच्या दुधाची मागणी जास्त मागणी आहे सर्व संस्थेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे शासनाच्या विविध योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी चेअरमन श्री पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हा बँकेच्या म्हैस कर्ज योजना याबाबतची माहिती जिल्हा बँक अधिकारी सुनील दिवटे, अण्णासाहेब विकास महामंडळ यांची विना व्याज मदत योजना याबाबतची माहिती ऋषिकेश आगरे यांनी दिली. यावेळी संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी प्रास्ताविकात कोरोकाळात गोकुळ दूध संघाची निवडणूक झाली आपल्याला भेटून आभार मानता आले नाहीत. परंतु यानिमित्ताने आपल्याला विविध योजनेचा लाभ मिळावा दूध वाढवण्यासाठी कोणकोणत्या उपायोजना आहेत त्याबाबतची माहिती व आपले दूध उत्पन्न वाढून आपला फायदा व्हावा. तसेच गोकुळ दुध संघाची विमा योजनेची देखील दूध उत्पादकांना माहिती मिळावी या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला असल्याचे श्रीमंत रेडेकर यांनी सांगितले.
या म्हैस दुध वाढ उत्पादक मेळाव्याला गोकुळ संचालक शशिकांत पाटील – चुयेकर, बाबासाहेब चौगुले, ऐ. एस. चौगुले, अमर पाटील, प्रकाश पाटील, बाजी शेळके, नंदकुमार ढेंगे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, जि. बॅक संचालक सुधीर देसाई, प. स. माजी सभापती.उदयराज पवार, संचालक सुधीर देसाई, तसेच एम. के. देसाई, मुंकुदराव देसाई, विष्णुपंत केसरकर, अनिल फडके सह गोकुळ संघातील सर्व विभागाचे अधिकारी आजरा तालुक्यातील सर्व संस्थेचे प्रमुख, संचालक मंडळ, दुध उत्पादक आदी उपस्थित होते.