Homeकोंकण - ठाणेआजरा देवर्डेत दिली. - विधवा प्रथेला मूठमाती.( बांगड्या व साडीचा, चोळीचा आहेर...

आजरा देवर्डेत दिली. – विधवा प्रथेला मूठमाती.( बांगड्या व साडीचा, चोळीचा आहेर देऊन केला आदर. )

आजरा देवर्डेत दिली. – विधवा प्रथेला मूठमाती.
( बांगड्या व साडीचा, चोळीचा आहेर देऊन केला आदर. )

आजरा. – प्रतिनिधी.

देवर्डे ता. आजरा येथे बौध्दनगर मधील थळू रामा कांबळे यांच्या जलदान विधी व पून्यानमोदन कार्यक्रमाच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा आजराचे कार्याध्यक्ष काशिनाथ मोरे यांनी कुटुंबातील नातेवाईक यांचे प्रबोधन करून मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना समाजामध्ये विधवा महिलांना तुच्छतेची वागणूक दिली जाते. तिला अपशकुनी करंट्या, पांढय्रा कपाळची म्हणून अवहेलना केली जाते. विधवामहिलांना वैयक्तिक व सामुदायिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही. पिढ्यान् पिढ्या विधवाच्या वाट्याला अपमान आणी अवहेलना सहन करावा लागतो. तीच महिला कोणाची तरी आई, बहिण, मुलगी, सुन, आजी; असते असे असून ही, पुरूषप्रधान संस्कृतीने सर्व जाती धर्मातील महिलांच्या वर अन्याय केला जातो. तथागत गौतम बुध्दांनी सांगितले प्रमाणे मानसाने मानसाशी मानसाप्रमाणे आदराने प्रेमाने वागले व वागीवले पाहीजे. संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार याचा वापर केला पाहिजे. यामुळे अनिष्ट चालीरीतीना मूठमाती दिली पाहीजे असे मत व्यक्त केले. यावेळी इंदूबाई थळू कांबळे याना त्यांचे भाऊ शंकर कांबळे माझी पोलिस पाटील किणे व त्याच्या पत्नी यांच्या हस्ते साडी चोळीचा आहेर देऊन आपले पतीच्या नावाने कुंकू व अलंकार पूर्वी प्रमाणे वापरण्यास दिले. यावेळी नंदा कांबळे गुंडू कांबळे रंजना कांबळे, लक्ष्मण कांबळे यांनी बांगड्या व साडीचा आहेर दिला. यावेळी त्यांची मुले शालन, विठ्ठल, पुष्पलता व रामजी कांबळे यांच्या सहाय्याने विधवा प्रथेला कृतीतून मूठमाती देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.