Homeकोंकण - ठाणेकोकण सुपुत्र शाहिर तुषार मधुकर पंदेरे यांच्या महाराष्ट्राची शाहिरी कार्यक्रमाने जिंकली शिव...

कोकण सुपुत्र शाहिर तुषार मधुकर पंदेरे यांच्या महाराष्ट्राची शाहिरी कार्यक्रमाने जिंकली शिव भक्तांची मने

कोकण सुपुत्र शाहिर तुषार मधुकर पंदेरे यांच्या महाराष्ट्राची शाहिरी कार्यक्रमाने जिंकली शिव भक्तांची मने

मुंबई (शांताराम गुडेकर )


हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार ३४९ वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर शिव राज्यभिषेक दिनोत्सव सेवा समिती कोकण कडा मित्र मंडळ, रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा झाला. सोहळ्याची सुरुवात शिरकाई देवीच्या पूजनाने झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची तुला, जागर आणि धार्मिक विधी यनिमित्ताने पार पडल्या.यानिमिताने किल्ले रायगडावर ढाल, तलवार, भाले यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याला खा. बारणे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र थोरवे आणि सुरेश पवार, नितीन पावले,सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यभारतून अनेक शिवभक्त उपस्थित होते.यावेळी कोकण सुपुत्र शाहीर तुषार मधुकर पंदेरे यांचा “महाराष्ट्राची शाहिरी” हा कार्यक्रम पार पडला.काल रायगड किल्ला या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळ्या मध्ये नामवंत पोवाडे सादर करणारे शाहिर होते.सादरीकरण करताना उत्तम ढोलकी पट्टू पांडुरंग सुतार,ऑर्गन मास्टर -अमोल नाणीस्कर, पॅड -स्वप्नील गुरव, शाहिर सुरेश राऊत, शाहिर संदेश पालकर, आणि शाहिर स्वप्नील थोरे यांनी चांगली साथ दिली.यावेळी गुरुवर्य वासुवाणी बुवा यांचा शिव गण सादर केला.पोवाडा व शिवगीते गायली.कोकण सुपुत्र शाहिर तुषार मधुकर पंदेरे यांच्या महाराष्ट्राची शाहिरी कार्यक्रमाने शिव भक्तांची मने जिंकली. आयोजक यांच्याहस्ते महाराष्ट्राची शाहिरी या समूहाला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.अनेकांकडून या शाहिरांचे कौतुक झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.