आजरा कारखाना बेअरिंग चोरी प्रकरणी ५ जणांना अटक. – पत्रकार परिषदेत माहिती. – फिर्यादीच आरोपी.
( काकत कळसा आणं गावाला वळसा )
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा सहकारी साखर कारखाना या ठिकाणी बेअरिंग चोरीप्रकरणी वादाचा बनलेला चोरी प्रकरणाच्या विषयाला आजरा पोलीसांच्या तपासात वेगळेच वळण मिळाले आहे. चोरीची फिर्याद देणारे तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक आरोपी झाले आहेत. कार्यकारी संचालकसह ५ जणांना पोलिसांनी संशयीत म्हणून अटक केली असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारगुडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली असून या प्रकरणात आणखी आरोपीची माहिती मिळणार आहे. आजरा कारखान्यातून ६ बेरिंग चोरीला गेल्या होत्या याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण यांनी आजरा पोलीसात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीसांचा सुरुच असताना कारखाना संचालकांनीही चौकशी समिती स्थापन केली होती.७ सदस्यीय या समितीने ३४ जणांना जबाबदार धरले होते. यामुळे कर्मचारी यांच्या मध्ये संभ्रमाचे व निराशाजनक वातावरण पसरले होते. दरम्यान कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीसात निवेदन देऊन योग्य तपास करण्याची मागणी केली होती. सहा.पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी सुमारे ६० जणांची कसून चौकशी केली.चोरीच्या सर्व बाबी तपासल्या.या प्रकरणात स्क्रॅप घेणारी व्यक्ती ज्यून्युअल शमशाद खान याच्यावर संशय गेल्याने पोलीसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो गुंगारा देत होता अखेर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्या जबाबात त्याने कार्यकारी संचालक प्रकाश रामचंद्र चव्हाण (रा.पेद्रेवाडी), स्टोअर किपर दिनकर उर्फ गुलाब बाबुराव हसबे (रा.चांदेवाडी), सुरक्षा अधिकारी भरत गणपती तानवडे (रा.देवर्डे) व सुरक्षारक्षक मनोहर यशवंत हसबे (रा.चांदेवाडी) (सर्व ता. आजरा) यांच्या सांगणे वरुन आपण या बेरिंग चोरल्याची कबूली ठेकेदार खान याने दिली. यानुसार पोलीसांनी चौघांना ताब्यात घेतले. या चौघांनीही गुन्ह्याची कबूली दिली आहे.
पोलीसांच्या तपासात गेटपास, रजिस्टरवर खाडाखोड, स्टोअर किपर विभाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. संगनमताने ही चोरी केली आहे. मुद्देमाल अद्याप ताब्यात मिळालेला नाही. या मोहिमेत बी एस कोचरगी, शिवाजी बामणे, दत्तात्रय शिंदे, संतोष घस्ती, अजित हट्टी यांचा समावेश होता. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.शैलेस बलकवडे, अप्पर अधिक्षक जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास झाला. कारखान्यात एकही सीसीटीव्ही नाही. कारखान्यात एकही सीसीटीव्ही नसल्याचे पोलीसांनी सांगितले. हा खर्च कारखान्याला परवडणारा नसल्याने सीसीटीव्ही लावले नसल्याचे उत्तर मिळाले आहे. परंतु याबाबत आजरा तालुक्यात या चोरी प्रकरणात काही कारखाना संचालक असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.