धुळे. – देवपुर ते पारोळा रोड या
रस्त्यांना जोडणाऱ्या कामाची पाहणी व त्याचा दौरा. माजी आम. अनिल अण्णा गोटे.
धुळे. – प्रतिनिधी.
धुळे शहरातील हत्ती डोह प्रभात नगर ते पारोळा रोड शेतकरी पुतळ्या पर्यंतच्या देवपुर ते पारोळा रोड या दोन्हीं रस्त्यांना जोडणाऱ्या कामाची पाहणी व त्याचा आखणी दौरा अनिल अण्णा गोटे यांच्यावतीने करण्यात आला.
माजी आमदार कार्यसम्राट श्री अनिल अण्णा गोटे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या धुळे शहराच्या विकासाच्या दूरदृष्टी व अभ्यासू नियोजन बद्य कार्यशैलीशी अनुरूप अशा धुळे शहरास भेडसावणाऱ्या धुळे शहरात आत येणाऱ्या व आतून बाहेर जाणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून प्रश्न सोडविण्यासाठी माननीय श्री अनिल गोटे यांनी श्री नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांच्याकडे धुळे शहराच्या विकास कामासंबंधी अभ्यासू, परिपक्वतेच्या व अनोख्या कार्यशैली, ईच्छा शक्तीच्या जोरावर धुळे शहरातील नागरिकांच्या रहदारीच्या समस्येच्या निवारणासाठी निधीसाठी मागणी केली असता त्यासंबंधी त्यांनी ४१ कोटींचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचा पहिला परतावा म्हणून १९ कोटी २२ लाख रुपयांची निधी स्वरूपात माननीय श्री नितीन गडकरी साहेब यांनी श्री अनिल अण्णा गोटेसाहेबांच्या प्रामाणिक,कार्यतत्पर, लोक कल्याण, लोकाभिमुख अशा सुप्त गुणांच्या कार्यास साध देत धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुपूर्द केला आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक ३० मे रोजी ६:३० वाजेच्या सुमारास पारोळारोड येथील रस्त्यापासून पाहणी दोऱ्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष श्री तेजस आप्पा गोटे, सार्वजनिक बांधकाम धुळे विभागातील अधिकारी कार्यकारी अभियंता सौ घुगरे मॅडम, एजाज शहा उपअभियंता तथा त्यांचे सहकारी अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते तसेच यावेळी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.